केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाब

Delhi समाचार

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाब
Delhi Chief MinisterArvind KejriwalArvind Kejiriwal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 83 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाब

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर शारिरीक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली. शरीराच्या संवेदनशील भागांवरही त्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत सांगितलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत बिभव कुमार यांनी कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा, काठीने मारहाण केल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वाती मलिवाल यांनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानी बिभव कुमार यांच्याकडून मारहाण होत असताना आपण त्यांना मला सोडून द्या अशी विनंती केली. यानंतर त्या बाहेर आल्या आणि थेट पोलिसांना फोन केला असं तक्रारीत लिहिलं आहे.

स्वाती मलिवाल यांनी सोमवारी कुमारने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाने या आरोपांची पुष्टी केली आहे. मात्र, याप्रकरणी कोणतीही रीतसर तक्रार दाखल झाली नव्हती. अखेर तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारविरुद्ध महिलेचा विनयभंग, गुन्हेगारी धमकी, शब्द आणि हावभाव किंवा महिलेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेली कृती आणि स्वेच्छेने दुखापत केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.

“माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझा जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. मला आशा आहे की योग्य कारवाई केली जाईल,” असं त्यांनी एक्सवर लिहिलं आहे. “गेले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मी दुसऱ्या पक्षाच्या सूचनेनुसार करत आहे असा दावा केला आहे. देव त्यांनाही आनंदी ठेवो,” असा स्वाती मलिवाल म्हणाल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Delhi Chief Minister Arvind Kejriwal Arvind Kejiriwal Swati Maliwal Vaibhav Kumar Bibhav Kumar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखलPraniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणामहाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लाकोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लारत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारामाझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
और पढो »

'स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...''स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...'Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:15:36