कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू... राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Mumbai समाचार

कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू... राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Ghatkopar Hording Collapsed14 Died In Ghatkopar IncidenceBharat Rathod
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी जेव्हा महाकाय होर्डिंग कोसळलं, तेव्हा पेट्रोल पंपावर जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्या होत्या. तर काहीजण अवकाळी पाऊस आल्याने पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. मात्र हाच आडोसा अनेकांच्या जीवावर बेतला.

सोमवार दुपारची वेळ, मुंबईत अचानक वादळी वारा वाहू लागला, मुंबईत धुळीचे लोट पसरले. मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. आणि त्याचवेळी घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यात 120 बाय 120 फूटांचं महाकाय लोखंडी होर्डिंग पत्त्यासारखा कोसळला . क्षणात होत्याचं नव्हतं झालं. होर्डिंग खाली अनेक जण दबले गेले. कोणाच्या तरी निष्काळजीपणामळे 14 मुंबईकरांचे हकनाक बळी गेले. यातलाच एक होता घाटकोपरमधला 24 वर्षांचा भरत राडोठ. 24 वर्षांचा भरत राठोड घाटकोपरच्या गोळीबार परिसरात राहात होता.

भरत हा कुटुंबातला कमावणारा एकमेव आधार होता. त्याला छोटा भाऊ आहे. वडिलांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलंय. तर कोरोना काळात भरतच्या आईचं निधन झालं. भरतच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांचा आधार हरपलाय. बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांमुळे राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.मेडिकलमध्ये काम करुन परिवाराचा गाडा भरत हाकत होता. कुटुंबाचा आधार असलेल्या थोरल्या मुलावरच काळाने घाला घातल्याने राठोड कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे..

भावेश भिंडेवर एवढे गुन्हे असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग्ज लावण्याची परवानगी कशी दिली.. त्याचं रेल्वे खात्यात कुणाशी साटंलोटं होतं का असा सवाल आता निर्माण होतोय... घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतलचं नाही तर आशियातलं सर्वात मोठं होर्डिंग असल्याची जाहीरातबाजी भावेश भिंडेंच्याच कंपनीने केली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ghatkopar Hording Collapsed 14 Died In Ghatkopar Incidence Bharat Rathod Bahrat Rathod Died In Ghatkopar Hording Collapsed Mumbai Corporation Bmc भरत राठोड घाटकोपर होर्डिंग दुर्घटना Bhavesh Bhinde

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
और पढो »

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासापुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
और पढो »

IPL सुरु असतानाच सुरेश रैनाच्या कुटुंबावर शोककळा, गुंडांनी काकाचं कुटुंब ठार केल्यानंतर आणखी एक धक्काIPL सुरु असतानाच सुरेश रैनाच्या कुटुंबावर शोककळा, गुंडांनी काकाचं कुटुंब ठार केल्यानंतर आणखी एक धक्काइंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) समालोचन करणारा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या (Suresh Raina) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या मामेभावाचा हिमालच प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
और पढो »

कोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेकोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेCovid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
और पढो »

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...Voter Died Outside Voting Station In Mahad: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
और पढो »

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..''मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:15:35