राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या कार्यक्रमात राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची जाणून घेण्यास अजित पवार यांचे नाव न घेत पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिलेत. रात नहीं ख्वाब बदलता है. मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है. अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होतोय. महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रावदीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच छगन भुजबळ यांची भाजपसह जवळीक वाढत आहे.
या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत छगन भुजबळ हा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी शरद पवार साहेब यांच्यासोबत होतो. त्यावेळेस काँग्रेस मध्ये जायचं की शरद पवार यांच्यासोबत रहायचे याबाबत सर्वच जण वेगवेगळे विचार करत होते. सोनिया गांधी यांच्या ऑफिसपासून काँग्रेसचे सर्वच नेते मला काँग्रेस सोडू नका असं सांगत होते. इतकचं नाही तर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील देण्यात आली होती. मात्र, मी माझा निर्णय बदलल नाही. मी पवार साहेबांचा हात धरुन शिवसेना सोडून येथे आलो आहे असं सांगत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही असं स्पष्टपणे सांगितले. माझा सर्व राजकीय प्रवास डोळ्यासमोर असताना मला कचऱ्यासारखं बाजूला केले जात आहे. एखादं पद मिळाले किंवा नाही मिळाले याचं काही नाही मात्र, त्यापेक्षा जी वागणूक मिळतेय ते फार वेदनादायी आहे. मी शिवसेनेत होतो. 11 प्रमुख नेते होते. तेव्हा देखील सर्वजण एकत्र बसुन चर्चा करायचे यानंतर साहेब निर्णय जाहीर करायचे. राष्ट्रावादीत देखील शरद पवार साहेब सर्वांना बालावून चर्चा करायचे. आता मात्र, असे चित्र पहायला मिळत नाही. कदाचित सध्याच्या पक्षात एकत्रित चर्चा करण्याची गरज वाटत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मी अनुभवी नेता असलो तरी कदाचित आता माझा अनुभव गरजेचा वाटत नसावा. शेवटपर्यंत माझ्या नावाची मंत्रीपदासाठी शिफारस केली जात होती. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेकजण मला मंत्रीपद द्यावे अशी आग्रही मागणी करत होते. मी सांगितले होते की मला दोन वर्षासाठी मंत्रीपद द्यावे. मतदार संघातील परिस्थिती या आहे याबाबत मी सांगितले होते. तसेच मंत्रीपद मिळणे का गरजेचे आहे हे देखील सांगितले. मात्र, चर्चा निष्पळ ठरली. पक्ष नेतृत्वाकडून मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेतला पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. सध्या मी एक साधा आमदार असेही भुजबळ म्हणाले
CHAGAN BHUJBLE MAHARASHTRA POLITICS SHIV SENA NCP AJIT PAWAR MUHAMMED SALIM ZEE 24 TAS POLITICS INDIA
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत.
और पढो »
वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »
MahaRERA ची मोठी कारवाई! राज्यातीत 1950 प्रोजेक्ट सस्पेंड; बिल्डर्सची बँक खाती गोठवलीMahaRERA Big Action: महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) एक मोठा निर्णय देत नियमांचं पालन न करणाऱ्या हजारो विकासकांना दणका दिलाय.
और पढो »
भुजबळांचा लाडक्या बहिणींवर दंडासह वसुलीचा इशाराछगन भुजबळ यांनी 'लाडक्या बहिणीं' योजनेत नियम मागे टाकून फायदा घेतल्याच्या प्रकरणात दंडासह वसुलीचा इशारा दिला आहे.
और पढो »
सुरेश धसांचा गौप्यस्फोट: वाल्मिक कराडच्या दादागिरीचा प्रसारबीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी Zee 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे यांना गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराड यांच्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि त्यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले.
और पढो »
महाराष्ट्रात सत्ता धारण करणार्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वादसंतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांनाच आव्हान देत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचे आवाहन केले. महायुतीत वाद निर्माण झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी सांगितले आहे.
और पढो »