डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
Dombivali Midc Company Fire : ही आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरु आहे. ही आग पसरत असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील एमआयडी फेज 2 मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत. अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. डोंबिवली परिसरात झालेल्या या भीषण स्फोटामुळे एमआयडीसी परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण 24 मे 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट झाला होता. यावेळी 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. ज्या कंपनीत हा स्फोट झाला होता, त्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेहदेखील सापडले नव्हते. त्यावेळी काही किलोमीटर परिसरात स्फोटामुळे हादरे जाणवले होते. या स्फोटाचा आवाजही दूरपर्यंत गेला होता. यावेळी अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होता.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
और पढो »
30 हजार पोलीस, 3 दंगल पथक आणि..; महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी 'अशी' सुरु आहे तयारीमतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाईपुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे.
और पढो »
मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »
धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमीTerrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
और पढो »