दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावले आहे.
दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने भारत ासाठी दमदार शतक झळकावलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मेलबर्न येथील सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ने 474 धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलिया ची ही आघाडी मोडीत काढताना टीम इंडियाची दमछाक झाली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधून भारताकडून टेस्ट सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्या 22 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) मेलबर्न टेस्टमध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चांगली पार्टनरशिप कडून दमदार शतक झळकावले. नितीशने 172 बॉलमध्ये 104 धावा केल्या असून दरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार ठोकले. टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये जात असताना नितीश कुमार रेड्डीने मैदानात जम बसवला आणि 83 बॉलमध्ये 51 धावा करत अर्धशतक ठोकले.21 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी हा भारताकडून तिसरा सामना खेळत असून यात त्याने आतापर्यंतच्या टेस्ट क्रिकेटमध्ये जवळपास 179 धावा केल्या होत्या. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलेलं अर्धशतक हे नितीश रेड्डीचे आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक होतं. टीम इंडिया संकटात असताना नितीशने मैदानात जम बसवत ठोकलेलं हे अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं, यामुळे भारतावरील फॉलो ऑनचं संकट देखील टळलं. अर्धशतक पूर्ण केल्यावर नितीशने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनची 'झुकेगा नही साला' ही ऍक्शन केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.नितीश कुमार रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला प्रथमच ओळख मिळाली जेव्हा आयपीएल 2023 पूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते
नितीश कुमार रेड्डी भारत ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट क्रिकेट शतक अर्धशतक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नितीश रेड्डी ने मेलबर्न में जड़ा शतकऑस्ट्रेलिया के खिलाफ चौथे टेस्ट मैच में नितीश रेड्डी ने अपने टेस्ट करियर का पहला शतक जड़ा.
और पढो »
नितीश रेड्डी का महाप्रहार, शतक जड़कर मचाया तूफानमहेंद्र सिंह धोनी की कप्तानी में भारत ने ऑस्ट्रेलिया को हराकर श्रृंखला में 2-0 की बढ़त बना ली है.
और पढो »
संजय राऊत कुणाच्या रडारवर? बंगल्याची दोघांकडून रेकी, घातपाताची भीतीमुंबई, दिल्लीतील घरासोबतच सामना कार्यालयाचीही रेकी केल्याच आरोप राऊतांनी केला आहे
और पढो »
नीतीश कुमार रेड्डी ने लगाया अपना पहला टेस्ट शतकभारतीय टीम के युवा क्रिकेटर नीतीश कुमार रेड्डी ने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पर अपना पहला टेस्ट शतक लगाया।
और पढो »
नीतिश कुमार रेड्डी ने ऑस्ट्रेलिया में बनाया शतकऑस्ट्रेलिया दौरे में नीतिश कुमार रेड्डी ने अपना चौथा टेस्ट खेलते हुए शतक लगाया है.
और पढो »
रेड्डी का ऐतिहासिक शतक, भारत बॉक्सिंग डे टेस्ट में ड्राइविंग सीट परनेशनल क्रिकेट टीम के युवा बल्लेबाज नीतीश कुमार रेड्डी ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ बॉक्सिंग डे टेस्ट के तीसरे दिन 105 रन बनाकर अपना पहला ऐतिहासिक शतक जड़ा है।
और पढो »