Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
महाविकासआघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटासह मित्र पक्षातील मोठ्या नेत्यांनीही विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊत ही यास अपवाद नाहीत. प्रचाराच्या रमधुमाळीदरम्यान राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेदरम्यान विरोधकांवर चौफेर टीकेची झोड उठवत सांगलीतील मतदारांविषयी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविषयी विश्वासार्ह वक्तव्य केलं.
सांगलीत तिरंगी लढत करण्यात कोणाचे डाव पेच आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या क्षणी सांगलीत भाजपचे उमेदवार असून, पक्ष त्या दोन्ही उमेदवारांना रसद पुरवत असल्याचं म्हटलं. सध्याच्या घडीला सांगलील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सर्व बाबतीत आघाडी घेतली असून, महाराष्ट्रातील इतर जागांविषयी आम्हाला विश्वास असून सांगलीतील जागेबाबतही असा विश्वास असल्याचं म्हणत त्यांनी नकळत चंद्रहार पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली.
सांगलीतील जागेवर मविआचं पारडं जड नसतं, तर भाजपला पंतप्रधान मोदी, अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असा इतका सारा फौजफाटा आणून इथं मैदानात उतरवण्याची गरज नव्हती, इथं काही लोक काकांसाठी येतायत तर, काही लोकं दादांसाठी येतात. पण, आमचा पैलवान ही राजकीय कुस्ती मारणार अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं.
भाजपला उद्देशून उद्या तुमची सत्ता गेली तर तुमच्या पक्षात वाईट कलह निर्माण होईल हे लिहून ठेवा असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ब्रह्मदेव नाहीत, इथं राम आणि कृष्णही आले गेले इथे मोदी आणि शाह कोण? असा बोचरा सवाल त्यांनी निवडणुकीदरम्यान सुरु असणाऱ्या या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रादरम्यान विचारला.
Loksabha Election Sanjay Raut Sanjay Raut News Chandrahar Patil Shivsena शिवसेना चंद्रहार पाटील संजय राऊत मविआ मराठी बातम्या बातम्या Sangli News News News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »
'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
और पढो »
लोकसभा चुनाव : तीसरे चरण की वोटिंग से पहले PM मोदी ने NDA प्रत्याशियों को लिखा पत्र, कही ये बातPM मोदी ने अमित शाह को पत्र लिखकर कहा,
और पढो »
'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
और पढो »
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »
Amit Shah Vs Chidambaram on CAA: CAA के नाम पर, तुष्टीकरण के काम पर ?Amit Shah Vs Chidambaram on CAA: गृह मंत्री अमित शाह ने कांग्रेस पर निशाना साधा। अमित शाह ने कहा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »