Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो.
पावसाळा सुरू झाला की लोकलचा खोळंबा हा नेहमीचा ठरलेलाच आहे. रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळं लोकल सेवा ठप्प होते किंवा कधी तांत्रिक बिघाडामुळं लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज आहे. पावसाळ्यापूर्वीची बहुंताश कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळं मुंबई लोकलचा वेग मंदावतो तर कधी कधी रुळांवर पाणी साचल्यामुळं ट्रेन ठप्प होते. अशावेळी रेल्वेकडून आधीपासूनच कामे हाती घेतली जातात. यंदाही रेल्वे प्रशासनाने कामे हाती घेतली आहेत. विशेषतः रेल्वेच्या ट्रॅकच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घातली जाणार आहे.
कलव्हर्ट, नाले आणि नाल्यांची साफसफाई, गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण आणि कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. वांद्रे आणि बोरीवली येथील कलव्हर्टची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला आहे.
मुसळधार पावसात पावसाचे पाणी भरल्यास गर्दीचे प्रमाण एका ठिकाणी वाढते. त्यामुळं एकाच ठिकाणी जास्त गर्दी होते. ही परिस्थिती लक्षात घेता उद्घोषणेद्वारे गर्दी कमी करण्याची घोषणा केली जाणार आहे. तसंच, सीसीटीव्हीद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे स्टॉलवर खाद्यपदार्थाच्या वस्तु जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.Full Scorecard →
Mumbai Local Train Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल ट्रेन अपडेट Mumbai Local Train News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »
खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
और पढो »
दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावरMumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
और पढो »
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत! नोकरदारांचे हाल, आठवड्याची सुरुवात 'लेट मार्क'नेWestern Railway Over Head Wire Technical Issue: बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये ओव्हर हेडवायर तुटल्याने तांत्रिक बिघाड होऊन पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
और पढो »
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
और पढो »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »