Indian Population : भारताची लोकसंख्या किती? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आणि अधिकृत आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. पाहून चिंता वाढेल...
लोकसंख्या वाढ ही समस्या भारतासह अनेक आशियाई देशांपुढं अडचणी निर्माण करतना दिसत आहे. येत्या काळात या समस्येत आणखी भर पडणार आहे. कारण, देशाची लोकसंख्या दुपटीनं वाढणार असून, संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं यासंदर्भातील माहिती नुकतीच जारी करण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड नं जाहीर केलेल्या नव्या अहवालानुसार देशाची लोकसंख्या वाढण्याचा वेग दुपटीनं वाढला असून, येत्या 77 वर्षांमध्ये यामध्ये सातत्यं दिसून येणार आहे. सध्या भारताची एकूण लोकसंख्या 144.17 कोटी इतकी आहे. 2006- 2023 यादरम्यान देशात 23 टक्के बालविवाह झाले. तर, प्रसुतीवेळी महिलांचा मृत्यू ओढावण्याचं प्रमाण कमी झालं. लोकसंख्येच्या या एकूण आकडेवारीमुळं आता भारतानं चीनलाही मागे टाकलं आहे, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं.
अधिकृत आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या 142.5 कोटी असून, 2011 च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंथ्या 121 कोटी इतकी होती. दरम्यान, भारतातील लोकसंख्येच्या 24 टक्के नागरिक हे 0 ते 14 वर्षे वयोगटातील असून, त्यामागोमाग येणाऱ्या 15 ते 64 वयोगटातील नागरिकांची संख्या 64 टक्के इतकी आहे. देशाती पुरुषांचं सरासरी आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचं सरासरी आयुर्मान 74 वर्षे इतकं आहे.UNFPA च्या दाव्यानुसार भारतात सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव हेल्ट रेट मागील 30 वर्षांपासून सुधारित स्तरावर आहे.
जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात, जवळपास 40 टक्के देशांतील महिला शरीरसंबंधांच्या बाबतीत निर्णय घेण्यासंदर्भात पुरुषांपेक्षा निरुत्साही असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, लोकसंख्यावाढीच्या विळख्यात अडकलेल्या भारतापुढं येत्या काळात अनेक आव्हानं उभी राहू शकतात हेच हा अहवाल सुचवताना दिसत आहे.स्पोर्ट्स
India Population News United Nations Population Fund UNFPA Report Child Marriage भारताची लोकसंख्या लोकसंख्या मराठी बातम्या चीन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्याMumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
और पढो »
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
और पढो »
MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
और पढो »
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
और पढो »