Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या शोध मोहिमेला यश आलंय. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. उत्तरप्रदेशमधल्या प्रयाग इथून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून बलात्कार प्रकरणातील हा प्रमुख आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
सुरुवातीला ताब्यात घेतलेला आरोपी हा पुण्यातील उंड्री परिसरातील आहे. तीन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर एकावर बलात्काराचा गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच तिघेही परप्रांतीय असून, गुन्ह्यापूर्वी ते बियर प्यायल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलीय. या प्रकरणातील आरोपी अतिशय सराईत असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. कोणताच पुरावा मागे ठेवायचा नाही अशा पद्धतीने त्यांनी गुन्हा केला. पण तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला.
Pune Rape Bopdev Ghat Crime Pune Bopdev Ghat Gang Rape One Accused Arrested पुणे बोपदेव घट बलात्कार प्रकरण Bopdev Ghat Case
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोलBopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.
और पढो »
पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक संशयित ताब्यात; 'त्या' सीसीटीव्हीमुळं लागला छडाPune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.
और पढो »
कोलकाता बलात्कार प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, संदीप घोष आणि SHO अटकKolkata News : कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरजी कर हॉस्पिटलचे माजी मुख्याध्यापक संदीप घोष आणि एका ठाण्याचे SHO यांना अटक केली आहे.
और पढो »
तिन्ही आरोपी परप्रांतीय, आधी बियर प्यायले आणि नंतर... बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात मोठी माहितीPune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. आरोपींच्या 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
और पढो »
तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »
Pune Gangraped: देर रात दोस्त के साथ घूमने गई लड़की के साथ बोपदेव घाट पर गैंगरेप, पीड़िता की हालत गंभीरPune Gangraped: महाराष्ट्र के बदलापुर के बाद पुणे के बोपदेव घाट से गैंगरेप की घटना सामने आई है. 21 वर्षीय पीड़िता देर रात अपने दोस्त के साथ बोपदेव घाट घूमने गई थी.
और पढो »