Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.
भाजपच्या भूमिके विरोधात जाऊन अजित पवार ांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारसभेत हिंदूंच्या मतांसाठी बटेंगे,कटेंगेची घोषणा दिली. योगींच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. भाजपच्या या भूमिकेचा विरोध अजितदादांनी ठामपणे करत मुस्लिम मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान आवाहन केले आहे. बटेंगे तो कटेंगे'वरून मुस्लिमांची मतं न मिळण्याचा धोका असल्यानं अजित पवारांनी बटेंगे,कटेंगेच्याविरोधात ठाम भूमिका घेतलीय. जागावाटपात राष्ट्रवादीला 60 जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही मुस्लिमांना दहा जागा दिल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला संधी दिल्याचा सांगत त्यांनी बटेंगे,केटेंगेला आपला विरोधक कायम ठेवलाय.
राष्ट्रवादीनं उमेदवारीत अल्पसंख्याकांना स्थान दिलंय. शिवाय अल्पसंख्याकांसाठी अनेक योजना राबवल्याचा दावा अजितदादांनी केलाय. काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते मी करून दाखवलं असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन मुस्लिमांना केलंय. अजित पवारांचा बटेंगे,कटेंगेला विरोध होता तर ते महायुतीतून बाहेर का? पडले नाहीत,असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारलाय.बटेंगे,कटेंगेवरून महायुतीतही मतभेद आहेत.
पंकजा मुंडेंनी बटेंग तो कटेंग वरून मोठं वक्तव्य केलंय. बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी असा दावा केल्याचं म्हटलंय.. योगी आदित्यनाथ यांनी राज्यात झालेल्या एका सभेत बटेंगे त कटेंगेचा नारा दिला होता..
Ajit Pawar BJP अजित पवार विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारणAjit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »
सदा सरवणकरांचा मोठा निर्णय, राज ठाकरेंची भेट घेऊन कळवणार; म्हणाले 'बाळासाहेबांचा...'Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »
'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलंChhagan Bhujbal On CM Post: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आठवडाभराचा कालावधी राहिलाय. असे असताना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाकडे विरोधकांचे बारकाईने लक्ष असते.
और पढो »
हार्ट अटॅक नाही, या कारणामुळे फॅशन डिझाइनर राकेश बालचे निधन; अतिशय गंभीर आजाराने घेतला जीवजगभरात फॅशन डिझाईनमध्ये नाव कमावणारा रोहित बालचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं आहे. बाल यांच्या निधनाच्या वृत्ताने फॅशन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ते दीर्घकाळापासून हृदयविकाराशी झुंजत होते. दिल्लीतील अश्लोक रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.
और पढो »
मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
और पढो »