Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये.. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंनी तिसरी आघाडी निर्माण केलीये..
मात्र, त्यांना आपल्या होमग्राऊंडवरील एकुलता एक आमदारानं सोडचिठ्ठी देत मोठा धक्का दिलाय..आपला भिडू बच्चू कडू अशी अमरावतीत बच्चूभाऊंची ओळख... पण याच बच्चूभाऊंचा भिडू पळालाय. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडू ंची साथ सोडलीय. महाराष्ट्रात सत्तापालट करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या बच्चूभाऊंना त्यांच्याच साथीदारानं चकवा दिलाय. राजकुमार पटोलेंनी बच्चू कडू ंच्या प्रहारची साथ सोडलीये. प्रहारची बॅट टाकून लवकरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा गणपती करण्याची भाषा करणाऱ्या बच्चू कडूंना हा मोठा धक्का मानला जातोय. या धक्क्यातून न सावरलेल्या बच्चू कडूंनी मोठा पलटवार करण्याचा इशारा दिलाय. आमदार राजकुमार पटेल यांनी धारणीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.. या मेळाव्याच्या बॅनरवरून प्रहार पक्षाचे नाव आणि बच्चू कडू यांचा फोटो काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता.
हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले... राजकुमार पटेलांच्या सोडचिठ्ठीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही पटेलांसह महायुती सरकारवर निशाणा साधला..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. तिस-या आघाडीसाठी पुढाकार घेतला, पण त्याआधीचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंच्या एकमेव साथीदाराला पळवलं.. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना आपल्याचं जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय.. या धक्क्यातून कडू कसे सावरतात हे निवडणुकीनंतरच पाहायला मिळणार.
MLA Bachchu Kadu Third Alliance In Maharashtra Shinde Group Maharashtra Politics बच्चू कडू शिंदे गट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
और पढो »
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार! एक नाही दोन गट तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीतMaharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिस-या आघाडीची चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका नव्या आघाडीची घोषणा केलीय. आंबेडकरांनी कोणत्या पक्षांची मोट बांधत नवीन आघाडी स्थापन केलीय पाहूयात.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावाMaharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
और पढो »