Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माहीमचा मुद्दा तापला होता. माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवरणकर आणि मनसेच्या अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेनंही माहीममधून उमेदवार उतरवला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र माहिममधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं माहीम मतरदारसंघ चर्चेत आहे. शिवसेनेचा उमेदवार महेश सावंत हेदेखील रिंगणात उतरले आहेत. असं असले तरी उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळं या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा होणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईत बुधवारी सभा झाली. 17 तारखेलाही सभा होणार आहे. शिवाजी पार्कला ही सभा घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेला मिळावे यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघेही आग्रही आहेत.
Maharashtra News Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Raj Thackeray Mns Shiv Sena Ubt Mahim Mumbai Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा असतानाच अन्य एका वेगळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
और पढो »
'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'Hindu Muslim Politics: राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »
सरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'Devendra Fadnavis Sada Sarvankar Nomination Against Amit Thackeray: मुंबईतील महीम मतदारसंघ सध्या तुफान चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असल्याने महायुतीची भूमिका चर्चेत आहे.
और पढो »
'...तर हा देश महान राहिलेला नाही', भाजपाचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाचे EC वर ताशेरेUddhav Thackeray Shivsena On Election Commission: देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण...
और पढो »
Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »
माहीममध्ये मोठा उलटफेर होणार? सरवणकरांचा उल्लेखासह आशिष शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण, म्हणाले 'अमित ठाकरे जर....'Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
और पढो »