Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे.
पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांनी महायुतीचा मेगाप्लॅन जाहीर केलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला यश मिळवून देण्यासाठी शाहांनी रोडमॅप सांगितल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात सत्तेचा सोपान गाठायचा असेल तर विदर्भ जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं शाहांनी विदर्भात महायुतीच्या 'मिशन 45'ची घोषणा केलीय. नागपुरात अमित शाहांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली. या बैठकीत शाहांनी भाजप नेत्यांना कानमंत्र दिलाय.
- आपल्यातले सर्व मतभेद दूर करा - बाहेरून आलेले कार्यकर्ते तुमच्या वरती काम करायला आलेले नाही. ते तुमच्यासोबत काम करायला आले, अशा सूचना शाहांनी दिल्याची माहिती आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपनं विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 44 जागांवर ताबा मिळवला आणि सत्तेत एंट्री घेतली. मात्र 2019च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला होता. तब्बल 15 जागांची घट होऊन भाजपला 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा विदर्भातलं आपलं स्थान मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मात्र, आता विदर्भ भाजपच्या हातून गेल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.विदर्भानंतर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय मराठवाड्यावर.
लोकसभा निवडणुकीतला फटका आणि विदर्भात गेल्या विधानसभेला झालेली पिछेहाट. याची जखम भाजपला खोलवर झालेली आहे. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ असणार आहे. महायुतीला रोखण्यात मविआला कितपत यश येतं, हे पाहणं रंजक असणार आहे.महाराष्ट्र
Vidarbha Marathwada Amit Shah Mahaplan Vidhansabha Election 2024 Maharashtra Assembly Election 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन, काय आहे भाजपचा 'एमपी' पॅटर्नMaharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येतेय. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात मध्यप्रदेश पॅटर्न राबवलं जाणार आहे. भाजपचा मध्यप्रदेश पॅटर्न नेमका आहे तरी काय ?
और पढो »
VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकलीMarathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
और पढो »
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; मुंबईसह 'या' जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणारMaharashtra Weather Update: वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
और पढो »
Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
और पढो »
नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यूJob News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
और पढो »
IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »