विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना 4 लाख 48 हजार 514 मते मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली. नारायण राणेंनी जवळपास 47 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विनायक राऊतांवर विजय मिळवला.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर मालवणमध्ये महाविकासआघाडीची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर माफी मागितली आहे. या बैठकीत भाषण करताना आमदार वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांची माफी मागितली. वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहे. हा मतदारसंघ वैभव नाईक यांचा गड म्हणून ओळखला जातो.मात्र लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात विनायक राऊत यांना अपेक्षेपेक्षा कमी मत मिळाली.
तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधून विनायक राऊत यांना आघाडी मिळेल, हे गणित आधीपासूनच अपेक्षित धरले जात होते. मात्र रत्नागिरीतील तीनही मतदार संघात विनायक राऊत यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा अधिक आघाडी नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघांमधून मिळाली. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तीनही मतदारसंघांमधून नारायण राणे यांना प्रत्येक फेरीमध्ये मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय झाला.
Loksabha Election 2024 Vaibhav Naik VINAYAK RAUT Vaibhav Naik Apologies Vinayak Raut Ratanagiri Sindhudurg Constituency Konkan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा...', Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफीJitendra Awhad Apologized Video : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन करत असताना बाबासाहेबांचा फोटो (Poster Of Babasaheb Ambedkar) फाडला होता. त्यावर आता आव्हाडांनी जाहीर माफी मागितलीये.
और पढो »
'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखणPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
और पढो »
'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपMaharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
और पढो »
Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेपShikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय.
और पढो »
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवरSangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
और पढो »
कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाडNCP Jitendra Avhad:कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला.
और पढो »