सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?
Sada SaravankarPolitics Of Maharashtraसदा सरवणकर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत.

माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावर भाजपनं ठाम भूमिका घेतलीये तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशातच सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. भेटीनंतर येत्या 24 तासात भूमिका ठरवण्यासाठी सरवरणकरांना मुदत देण्यात आलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलीय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून महेश सावंत रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आपला उमेदवार मागे घेणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत.

माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सदा सरवणकर यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या शाखेबाहेर गर्दी केली. तसेच सरवरणकरांनी निवडणुकीतून माघार न घेण्याची मागणी केली. त्यानंतर सरवणकरांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्यास माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाची साथ मात्र मनसेच्या अमित ठाकरेंना मिळेल अशीही चर्चा सुरू आहे.

2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपच्या विलास आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं माहिमध्ये भाजपचे देखील चांगली ताकद आहे. मनसेला भाजपाचा पाठिंबा मिळाल्यास अमित ठाकरे सहज निवडून येऊ शकतात. अशा राजकीय परिस्थितीत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sada Saravankar Politics Of Maharashtra सदा सरवणकर विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोललेMaharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
और पढो »

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरBig Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरShinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
और पढो »

'महाराष्ट्रात मोदी व शाहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोल'महाराष्ट्रात मोदी व शाहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोलShivsena Slams PM Modi: धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत.
और पढो »

करवाचौथ पर क्या दें ऐसा खास, जिससे पत्नी रहे सदा आपके पासकरवाचौथ पर क्या दें ऐसा खास, जिससे पत्नी रहे सदा आपके पासकरवाचौथ पर क्या दें ऐसा खास, जिससे पत्नी रहे सदा आपके पास
और पढो »

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवडरतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवडRatan Tata s successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय.
और पढो »

5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलकMaharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-04-28 07:00:09