Konkan Railway : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत.
सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या; बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका कोकण रेल्वेला बसला आहे. दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. रेल्वे वाहतूक थांबल्याने कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. थेट रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने खेड- दिवाण- खवटी दरम्यान असलेला रेल्वे बोगदा बंद झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु होण्यास अडीच ते तीन तास लागण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे. विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. ट्रॅक वरील माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी पाच ते सहा तास लागतील.चिपळूण, खेडला पाणी भरल्याने कोकण रेल्वेला फटका बसला आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्याने अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. दुरांतो एक्स्प्रेस माणगाव रेल्वे स्थानकात रखडली आहे. अनेक एक्सप्रेस ट्रेन चार ते पाच तास वेगवेगळ्या स्थानकात उभ्या आहेत.
Express Trains Sawantwadi Tejas Janshatabdi Konkan Railway Crack In The Tunnel कोकण रेल्वे कोकण रेल्वे ठप्प
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकण रेल्वे पुन्हा कोलमडली; बोगद्यात पाणी शिरले, 'या' 9 ट्रेन रद्दKokan Railway Train Update: मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले
और पढो »
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »
रेल्वे रूळांवर सेल्फी घेत होते नवरा-बायको; समोरुन ट्रेन येताना पाहताच दरीत उडी घेतली अन्...Couple Jumps Into Ditch: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका जोडप्याच्या जीवावर बेतले आहे.
और पढो »
भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »
Big Reveal On Godhra Riots: अयोध्या टू गोधरा साजिश गहरी थी ?Big Reveal On Godhra Riots: 27 फरवरी 2002 की सुबह साबरमती एक्सप्रेस जब गोधरा स्टेशन पर ट्रेन के कोच Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
तेज रफ्तार एक्सप्रेस ट्रेन की चपेट में आया हाथी, लड़खड़ाते हुए पटरी पर गिरा, वीडियो देख इमोशनल हुए लोगवीडियो में देखा जा सकता है कि, कैसे एक हाथी एक्सप्रेस ट्रेन की चपेट में आ जाता है और फिर रेलवे ट्रैक पर घूमते हुए बुरी तरह नीचे गिर जाता है.
और पढो »