Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.
'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?
Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.पुण्याच्या नाना पेठेतली अंगाचा थरकाप उडवणारी घटना. 5 ते 6 दुचाकीवरुन आलेले 10 ते 12 हल्लेखोर क्षणाचाही विलंब न करता पिस्तुलातून गोळ्या झाडतात. तीक्ष्ण हत्याराने समोरच्यावर सपासप वार करतात. काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची भररस्त्यात हत्या करण्यात आली.
संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. वनराजच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून कौटुंबिक तसंच संपत्तीबाबत त्यांचा आपला भाऊ वनराजसोबत वाद सुरु होता. गणेश कोमकरला नाना पेठेतील एक दुकान दिलं होतं. मात्र पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत दुकान पाडण्यात आलं होतं. वनराजनेच दुकानांवर कारवाई करायला सांगितल्याचा संशय कोमकरांना होता. 'तू आमच्या पोटावर उठलास, तुला सोडणार नाही', असा धमकीवजा इशारा बहिणींनी वनराजला दिला होता.
आंदेकर गँग ही पुण्यात गेली 40 वर्ष कुप्रसिद्ध आहे. मटका, जुगार, दारू, हफ्ते वसुली अशा अवैध कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. गुन्हेगारीबरोबरच वनराज राजकारणातही सक्रिय होता. दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून सख्ख्या बहिणींनीच वनराज आंदेकरची सुपारी दिलीय. आणि भर चौकात गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करुन आपल्याच भावाचा गेम केला.महाराष्ट्र
Vanraj Andekar Murder Case PUNE MURDER
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकीVanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती.
और पढो »
Kangana Ranaut : शेतकऱ्यांवर कंगना असं काय बोलली? की भाजपनेच केला विरोध!BJP objection on Kangana statement : शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तंबी दिली आहे. काय म्हणाली होती कंगना?
और पढो »
Hit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीMumbai Goregaon Hit and Run : मुंबईतील गोरेगाव इथं झालेल्या या अपघतावेळी नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर येताच...
और पढो »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
और पढो »
आपल्या बालकासोबत वाईट घडलं तर काय कराल?Child Protection Committee: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.
और पढो »