Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडिच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे.
अर्थसंकल्पाच्या आडून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न म्हणजे हा अतिरिक्त संकल्प आहे. अडिच वर्षे तिजोरी साफ करून झाल्यावर सरकारी तिजोरीवर महायुती सरकारने शेवटचा हाथ मारून तिजोरी साफ केली आहे. स्वत:चे खोके भरून झाल्यावर जनतेसाठी काहीतरी केल्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित्त घेतलं आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडं वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडलं आहे. राज्यात महिलावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या या सगळयाचे प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्री माझी 'लाडकी बहिण' योजना आणली आहे. गरीब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही.
आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेनं खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली आहे. महाराष्ट्राला गुजरातने मागे टाकल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल होता. दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिल होतं. हे काम या सरकारने चोख बजावलं आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्डयात घातले आहे. गुजरातच्या खाल्या मिठाला जागणारे हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही.
Budget Session Finance Minister Ajit Pawar Opposition Criticized The Budget Maharashtra Budget Session Live Maharashtra Budget 2024-2025 Live Budget Budget 2024-2025 Budget Session Vidhan Sabha Maharashtra Budget Session 2024-2025 Maharashtra Budget 2024-2025 Maharashtra Petrol Rate Maharashtra Diesel Rate Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan 2024-25 Eknath Shinde CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Finance Minister Maharashtra Politics Marathi News Latest Marathi News Breaking News Marath
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
और पढो »
'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावाChhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
और पढो »
Video: राम मंदिर आने वाले श्रद्धालुओं को लेकर बड़ी खबर, श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट ने लिया फैसलाRam Mandir Ayodhya: अयोध्या श्रीराम मंदिर में दर्शन करने श्रद्धालुओं को अब चंदन का टीका नहीं लगेगा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'राष्ट्रपतींनी मोदींना दही-साखर भरवणं हे लोकशाही संविधान मानणाऱ्यांना..'; राऊत स्पष्टच बोललेSanjay Raut On President Murmu Feeding PM Modi Curd Sugar: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत अनेक गोष्टींवर आक्षेप घेतानाच राष्ट्रपतींच्या एका कृतीवरुनही टीका केली आहे.
और पढो »
'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासाMassive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
और पढो »
'सुंभ जळाला; पीळही जाईल', ठाकरे गटाची शेलक्या शब्दांत टीका; म्हणाले, 'मोदींचे गरीबांचे कैवारी..'Uddhav Thackeray Group Slams PM Modi: मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
और पढो »