पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.
'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...
उत्तर प्रदेशात एका 20 वर्षीय तरुणीने आपल्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करत रस्त्यावर सर्व कपडे काढले. ही तरुणी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी अखेर 17 दिवसांनी 22 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. जम्मूमधील इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो एमटेक करत आहे. मंगळवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थिनीने निराशेतून हे कृत्य केलं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “आम्ही आरोपीला पुढील तपासासाठी आग्र्याला बोलावलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला अटक केली". पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्याने आग्रा येथील विद्यापीठातून बीटेक पूर्ण केले.
यादरम्यान तरुणी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत होती. कारवाई होत नसल्याने हताश झालेल्या, तरुणीने अधिकाऱ्यांना प्रकरणाकडे लक्ष देण्यास भाग पाडण्यासाठी रविवारी सार्वजनिकरित्या कपडे उतरवण्याचा निर्णय घेतला.तरुणीने केलेलं हे निषेध आंदोलन पाहिलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं की, “महिलेने दुपारी रस्त्यावर स्वत:चे कपडे उतरवले आणि पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. दोन महिला पटकन तिच्या मदतीला आल्या आणि तिला कपड्याने झाकलं. त्यांनी तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले.
रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं आहे की,"तिला रविवारी संध्याकाळी येथे दाखल करण्यात आलं. आम्ही तिला तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवले. या काळात आम्ही सकाळपासून झोपेपर्यंत तिच्या दैनंदिन हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं. आम्हाला काहीही असामान्य आढळलं नाही. मंगळवारी तिला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.मुंबई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
और पढो »
यशश्री हत्याकांडात नेमकं काय घडलं? पोलीस अधिकाऱ्याने सगळा घटनाक्रम उलगडला, म्हणाला 'दोघे ठरवूनच...'Yashashri Murder Case: उरणमधील यशश्री शिंदे हत्या (Yashashri Shinde Murder) प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. दरम्यान, त्याला अटक कशी करण्यात आली याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) दिली आहे.
और पढो »
बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
और पढो »
Badlapur Sexual Abuse: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
और पढो »
Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.
और पढो »
भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली.
और पढो »