Shirdi Sai Sansthan: कित्येक दिवसांपासून साई संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजनाचा महाप्रसाद दिला जात असून साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे.
' साई मंदिर ातील मोफत महाप्रसाद बंद करा, त्यामुळे गुन्हेगारी वाढते' भाजप नेत्याची मागणी Shirdi Sai Sansthan:
कित्येक दिवसांपासून साई संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजनाचा महाप्रसाद दिला जात असून साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी साई संस्थानने खर्च करावे असंही सुजय विखे म्हणालेत. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत. हे योग्य नाही, असे ते म्हणाले.
सुजय विखे पाटील कुठल्या संदर्भाने बोलले हे आम्हाला माहीत नाही मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी देशभरातील देणगीदार साईभक्त साई संस्थांनला देतात आणि त्यातून अन्नदान होत असतं याच्या माध्यमातून देशभरातील भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात. ज्या साई भक्तांना ऐच्छिक रक्कम द्यायची ते देऊ शकतात. विकास कामांसाठी साईबाबा संस्थान कडे करोडो रुपयांचा निधी आहे ते त्यातून विकास करू शकतात त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नसल्याचं संग्राम कोते यांनी म्हणलय.
ज्या ठिकाणी शुल्क आकारायला पाहिजे त्या ठिकाणी शुल्क आकारलेच गेलं पाहिजे मात्र साईबाबांनी जी प्रथा सुरू ठेवली होती. साईबाबा मोफत सगळ काही करत होते.तेव्हा ते शुल्क आकारत नव्हते. बाकी दुसरीकडे शुल्क आकारले जावेत. मात्र ज्या ठिकाणी गरिबांना दोन घास मोफत मिळतात त्या ठिकाणी शुल्क करू नये अशी प्रतिक्रिया काही साई भक्तांनी दिली आहे.
तर काही साई भक्तांनी सुजय विखे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत जो साईभक्त देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनाला येतो तो साईभक्त दहा ते पंधरा रुपयांचं शुल्क जेवणासाठी देऊ शकतो असं काही साईभक्त म्हणालेत. या प्रकाराबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराबाबत बोलण्यास नकार दिलाय.महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र बातम्या
Shirdi Free Meal Shirdi Mahaprasad Sai Temple BJP Leader Demands Zee 24 Taas साई मंदिर मोफत महाप्रसाद भाजप नेते
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रेशन मोफत देण्यापेक्षा रोजगारावर काम करा; सरकारी धोरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा कटाक्षSupreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती.
और पढो »
काँग्रेस आमदाराची खळबळजनक मागणी: बेळगावला केंद्रशासित करा तर मुंबईलाही!कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराने बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी केली आहे. या मागण्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
और पढो »
मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ होणार?मुंबईच्या शिवसेनेच्या आमदाराकडून मुख्यमंत्र्यांना 700 स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
और पढो »
संसदेत भाजपाविरोधात आंदोलनात भाजप खासदाराची दुखापतसंसदेच्या हिवाळ्या अधिवेशना दरम्यान काँग्रेसने भाजप विरोधात आंदोलन केले. या दरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी यांना दुखापत झाली आहे.
और पढो »
बिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार?बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्र विधानसभेत वापरला गेलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार धास्तावल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या मार्गाने भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे बिहारमध्येही भाजप हा पॅटर्न वापरू शकतो. अमित शहा यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर नितिशकुमार नाराज झालेत. त्यात लालू यादव यांनी महागठबंधनात परत येण्याची ऑफर दिल्या आहेत.
और पढो »
आरबीआयची चिंता: मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक का?आरबीआयने राज्यांमधील मोफत योजनांवर चिंता व्यक्त केली आहे. या योजनांचे भविष्यावर परिणाम असू शकते.
और पढो »