आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर करण्यात आली आहे. यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत.
जुलै 2024 पासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात याची घोषणा केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितरित्या जमा झाले.
31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये खात्यात वर्ग करण्यात आले. यानंतर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. आता 30 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट आमि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हे मानधन आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका,"समूह संघटक-CRP ", मदत कक्ष प्रमुख, CMM , आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते.
Big News Last Date For Application Submission Announced माझी लाडकी बहिण योजना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
और पढो »
पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलाMajhi Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले.
और पढो »
लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
और पढो »
लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »
यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
और पढो »
म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरMhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांची सोडत काढली आहे. या सोडतीला निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आता देण्यात आली आहे.
और पढो »