Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu moosewala) हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं?
Goldy Brar Death : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंडची गोळ्या झाडून हत्या, 'या' गँगने घेतली जबाबदारी
Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं?पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी गोल्डी ब्रार याची हत्या झाली.
सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर गोल्डी ब्रार याचं नाव चर्चेत आलं. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं होतं. पंजाब युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नेता गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील एका क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा गुन्हेगारी विश्वात होऊ लागली.
गँगस्टर गोल्डी ब्रारने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपणच सिद्धूी मुसेवालाची हत्या केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलीस तपासात देखील गोल्डी ब्रारचं नाव समोर आलं."सिद्धू मुसेवाला हा फार इगो असलेला व्यक्ती होता. त्याने त्याच्या राजकीय आणि आर्थिक सामर्थ्याचा चुकीचा वापर केला. त्याला धडा शिकवणं आवश्यक होतं आणि तो त्याला शिकवला," असं गोल्डीने म्हटलं होतं. त्यावेळी त्याने सलमान खानला देखील धमकी दिली होती.
दरम्यान, एकीकडे सलमान खानच्या दुश्मानाचा खात्मा झालाय. तर मुंबईमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात चौकशीत असलेला आरोपी अनुज थापन याने आत्महत्या केली आहे. पोलिसा कोठडीत असताना त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीये. त्यावर आता सीआयडी चौकशी करणार आहे. लॉकअपमध्ये अनुजने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपी अनुज थापन लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात होता. मुंबई पोलिसांनी अनुजला पंजाबमधून अटक केली होती.
Goldy Brar Goldy Brar Death Goldy Brar Murder Goldy Brar News Salman Khan Goldy Brar America Goldy Brar America News Goldy Brar Killed Chandigarh News In Marathi Latest News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
और पढो »
'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
और पढो »
WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराकेंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे.
और पढो »
पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरणLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
और पढो »
Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
और पढो »