India vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.
तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता बीसीसीआयने आगामी कार्यक्रमाची आखणी केली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बॉब्वे दौऱ्यावर रवाना झाली आहे. मालिकेला 6 जुलै तारखेपासून सुरुवात होत आहे. अशातच बीसीसीआयने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने तीन खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
टीम इंडियाच्या निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जागी साई सुधारसन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे. वर्ल्ड कप घेऊन भारतात येणारी टीम उशिरा येणार असल्याने बीसीसीआयने तडकाफडकी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे इथे होईल. तर लगेच 7 जुलै रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 10 जुलै रोजी तर चौथा सामना 13 जुलै रोजी असेल. पाचवा सामना 14 जुलै रोजी होईल. त्यामुळे एकाच आठवड्यात संपूर्ण टी-ट्वेंटी मालिका संपणार आहे.
IND Vs ZIM T20I India Tour Of Zimbabwe Sai Sudharsan Jitesh Sharma Harshit Rana Sanju Samson Shivam Dube Yashasvi Jaiswal Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs SA Final: ना प्रॅक्टिस, ना प्रेस कॉन्फ्रेंस; का घेतला टीम इंडियाने इतका मोठा निर्णय?IND vs SA T20 World Cup 2024 Final: आयसीसीने फायनलपूर्वी टीम इंडियाबाबत अधिकृतपणे काही अधिकृत प्रकाशन जारी केलं होतं. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद होणार नसल्याचे सांगण्यात आलं होतं.
और पढो »
IND vs ZIM: जिंबाब्वे दौरे के लिए बीसीसीआई ने किया टीम इंडिया का ऐलान, शुभमन गिल कप्तान, 5 युवाओं को मौकाIND vs ZIM: जिंबाब्वे दौरे के लिए बीसीसीआई ने किया टीम इंडिया का ऐलान, शुभमन गिल कप्तान, 4 युवाओं को मौका
और पढो »
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
IND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनT20 World Cup India vs Ireland Live Score : आजपासून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.
और पढो »
विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.
और पढो »
IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »