IPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
IPL 2024: हार्दिक पांड्याला मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे. IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता जवळपास अर्ध्यावर आली असून, संघांचं भवितव्य थोडंफार स्पष्ट झालं आहे. आयपीएल स्पर्धा सुरु झाली तेव्हा हार्दिक पांड्याची सर्वाधिक चर्चा होती. रोहित शर्माला हटवून त्याला कर्णधार केल्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबईच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
हार्दिक पांड्या संघासह वैयक्तिक कामगिरीतही चमक दाखवू शकलेला नाही. त्याने 7 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतले असून 146.87 च्या सरासरीने 141 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर होणारी टीका कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फंलदाज रॉबिन उथप्पा याने 'द रणवीर शो'मध्ये यासंदर्भात काही खुलासे केले आहेत.
"हार्दिक पांड्यामध्ये महान खेळाडू होण्याची क्षमता आणि कौशल्य आहे. ज्या संघाने त्याचा शोध लावला त्याच संघाने त्याला दुसऱ्या संघात जाऊ दिलं. त्या संघासह 3 ते 4 वेळा स्पर्धा जिंकल्याने त्यानेही संघ सोडला. त्याला कदाचित थोडं वाईट वाटलं असावं. तो गुजरात टायटन्स संघात गेला. तिथे त्याने पहिल्या हंगामात स्पर्धा जिंकून दिली आणि नंतर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. यानंतर चर्चा सुरु झाली," असं रॉबिन उथप्पाने सांगितलं."त्याला आपल्यावर होणारी टीका, ट्रोलिंग, मीम्स या सर्व गोष्टींची कल्पना आहे.
रॉबिन उथप्पाने यावेळी भारतीय संघाचा वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतरही कशाप्रकारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला याची जाणीव करुन दिली. हार्दिक पांड्यालाही अशी वागणूक द्यायला हवी असा सल्ला त्याने दिला आहे. "हे आपलं कर्तव्य आहे. यामुळेच आपल्याला दोन वेळचं अन्न मिळत आहे. माझं काम टीका करणं आहे. कॉर्पोरेटमध्ये काम करणारी व्यक्ती टीव्हीवर येऊन टीका किंवा त्याबद्दल मतही व्यक्त करणार नाही. असं असताना, तुम्ही इतर व्यक्ती अपयशी होत असल्यास काही प्रमाणात सहानुभूती आणि सन्मान दाखवावा लागेल. एक देश म्हणून आम्ही केलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे आमची प्रेमाची अभिव्यक्ती आणि आम्ही विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय संघाबद्दलची आमची प्रतिक्रिया.
IPL 2024 Indian Premiere League Mumbai Indians MI Robin Uthappa Hardik Pandya
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »
प्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »
NEET 2024: आखिर क्या है नीट में अच्छा स्कोर, क्या है इसके मायने, जानिए कैटेगरी वाइज नीट स्कोर रेंजNEET 2024: आखिर क्या है नीट में अच्छा स्कोर
और पढो »
हार्दिक पंड्या के बिना टी20 वर्ल्ड कप नहीं जीत सकता भारत, इंग्लैंड के दिग्गज की रोहित शर्मा को चेतावनीऑलराउंडर हार्दिक पंड्या आईपीएल 2024 में मुंबई इंडियंस की कप्तानी कर रहे हैं।
और पढो »