Kolkata Sexual Assault Case : कोलकाता येथे झाल्या प्रकारासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित महिला डॉक्टरसोबत घडलेल्या अतिप्रसंगासंदर्भात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे.
संपूर्ण देशभरातून सध्या कोलकाता येथे महिला ज्युनिअर डॉक्टरवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर अतिशय निघृणपणे पीडितेची हत्या करण्यात आल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. याच धर्तीवर FAIMA म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असेसिएशनच्या वतीनं 13 ऑगस्टपासून देशव्यापी आंदोलन करत घडल्या प्रककरणाचा कडाडून विरोध करण्याचं ठरवलं.
संघटनेकडून सध्या पीडितेला न्याय देत नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत असून, ही मागणी मान्य होईपर्यंत देशभरातील रुग्णालयांमधील ओपीडी आणि इतर पर्यायी सेवा- सुविधा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या अतिशय निंदनीय आणि मन हेलावणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा विरोध करत वैद्यकिय संघटनांनी हे आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे.
X च्या माध्यमातून FAIMA च्या वतीनं करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठीच्या सूर आळवण्यात आला. 'आम्ही देशभरातील आंदोलनकर्त्या डॉक्टरांची साथ देत आहोत. उद्यापासूनच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही देशभरातील डॉक्टरांना करत आहोत' अशी साद या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली.तिथं इंडियन मेडिक असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित पीडितेला न्याय मिळवून देण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली.
पीडितेच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्यामुळं आणि तिच्यासोबत झालेल्या दुष्कृत्यामुळं या संपूर्ण प्रकरणानं देशभरातून संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळतात सदर रुग्णालयाच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी आंदोलनं करत या प्रकरणाचा तपास तातडीनं आणि वेगात सुरू करण्याची मागणी करत सखोल चौकशी, दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा अशा मागण्या उचलून धरल्या.
सदर प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, संयज रॉय असं त्याचं नाव. मद्यपानाच्या आहारी गेलेला हा आरोपी अश्लील व्हिडीओ पाहण्याच्या व्यसनाधीन होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो बऱ्याचदा रुग्णालयात ये- जा करताना दिसला. आरोपीच्या चौकशीदरम्यान आणि घटनास्थळावरून हाती लागलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून अनेक खळबळजनक खुलासे झाले असून, आता या घटनेमध्ये पीडितेला न्याय मिळून आरोपीला नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
FAIMA FAIMA Calls Nationwide Shutdown OPD Services Kolkata Kolkata Doctor Rape Case News Kolkata Rape-Murder Case RG Kar RG Kar Doctor Murder Case कोलकाता Kolkata News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, मुंबई पोलिस घेतायेत 'मामा'चा शोध, 9 मिनिटांची ऑडिओ क्लिप...Mumbai News today: सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पोलिस मामा नावाच्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत.
और पढो »
Kolkata Doctor Murder: देशभर में आज OPD सेवाएं ठप, डॉक्टरों ने किया देशव्यापी हड़ताल का एलानBengal Doctor Murder कोलकाता के सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज एंड हास्पिटल में एक चिकित्सक के साथ दुष्कर्म और हत्या मामले को लेकर लोगों में उबाल है। इस बीच मामले को लेकर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल एसोसिएशन ने आज यानी मंगलवार को हड़ताल का एलान किया है। उधर आरजी कर मेडिकल कॉलेज के जूनियर डॉक्टरों और छात्रों का भी प्रदर्शन जारी...
और पढो »
Baguiati Incident: মাথায় ছাদ ভেঙে দেহ ঢুকল মেঝেতে, খাস কলকাতায় কিশোরের মৃত্যু ঘিরে রহস্যkolkata baguiati news roof breaks over boy inside house death in hospital post mortem conducted today
और पढो »
कोलकाता में आज TMC की शहीद दिवस रैली: ममता बनर्जी के साथ मंच पर पहली बार अखिलेश यादव भी मौजूद रहेंगेWest Bengal Kolkata TMC Martyrs Day Rally 2024 Update. Follow Mamata Banerjee, Akhilesh Yadav Kolkata Speech Latest News On Dainik Bhaskar.
और पढो »