Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
प्रचंड उकाड्यानं हैराण कराणारा मे महिना मागे राहिला असून, आता जून महिन्याची सुरुवात झाली आहे. ओघाओघानं आता पावसाची, मान्सूनची प्रतीक्षा शिखरावर पोहोचली आहे. असं असलं तरीही अद्याप मात्र राज्यापासून पाऊस काहीसा दूर आहे हीच वस्तूस्थिती. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात कुठं उष्णतेची लाट, तर कुठं उष्ण आण दमट स्थितीच पाहायला मिळणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. विदर्भात ब्रह्मपुरी इथं तापमान 46.9 अंशांवर पोहोचलं असून त्याचा दाह सोसेनासा झाला आहे. हवामानाची ही स्थिती पाहता सध्या कोकणात दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे , पालघर, रायगड इथं मात्र आकाश निरभ्र राहणार असून, उष्णतेचा दाहसुद्धा वाढणार आहे. राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.उकाडा दर दिवसागणिक तीव्र होत असतानाच राज्यात मान्सूनच्या आगमनाची वाट सगळेच पाहताना दिसत आहेत. सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या अनुषंगानं राज्यात पोषक वातावरण पाहायला मिळत असून, बंगालच्या उपगासगरावर असणारी मान्सूनची उपशाखा आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणMaharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
और पढो »
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या तापमानात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत असतानाच आता सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे मान्सूनची.
और पढो »
Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...
और पढो »
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
और पढो »