Puneri Paltan VS Telugu Titans: तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला.
विजय मलिकने कौशल्यपूर्ण चढाईत वसूल केलेल्या ८ बोनस गुणांच्या जोरावर अखेरच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या सामन्यात तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला. प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील घरच्या मैदानावरील मोहिमेची सांगता तेलुगु टाययन्सने विजयाने केले. या विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत पलटणपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आले आहे.
सामन्यातील पूर्वार्ध जेवढा रंगतदार झाला, तेवढा सामन्याच्या उत्तरार्धातील अखेरची दोन मिनिटे श्वास रोखून धरायला लावणारी ठरली. बचावाच्या आघाडीवर दोन्ही संघांना फारसे यश मिळाले नसले, तरी दोन्ही संघाच्या चढाईपटूंनी निर्विवाद वर्चस्व राखले. पुर्वार्धातच गुडघ्यात चमक आल्याने पुणेरी पलटणचा कर्णधार अस्लम इनामदारला बाहेर जावे लागले. याचा पलटणच्या खेळावर जरुर परिणाम झाला. त्याची उणिव पंकज मोहितने भरुन काढली. त्याने ९ गुणांची कमाई केली. पण, त्याला अन्य चढाईपटूंकडून तेवढी साथ मिळाली नाही.
पूर्वार्धातील सामन्याचा वेग लक्षात घेतल्यावर उत्तरार्धात असाच खेळ बघायला मिळणार असे वाटत होते. मात्र, दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे उत्तरार्धातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ गुणांची कमाई केल्याने गुणफलक २४-२४ अशीच बरोबरी दाखवत होता. अखेरच्या दहा मिनिटांत पुन्हा एकदा चढाईपटूंच्या कौशल्यांचा कस लागला. पंकज मोहितेला या वेळी व्ही अजित कुमारच्या चढायांची साथ मिळाली. मात्र, विजय मलिकने केलेल्या खोलवर चढाया अधिक लक्षात राहिल्या.
पहिल्या सत्रात पुणेरी पलटणसाठी पंकज मोहिते आणि तेलुगु टायटन्ससाठी पवन सेहरावत यांच्या चढाया असाच खेळ झाला. बचावाच्या आघाडीवर एक पाऊल पुणेरी पलटणचे पुढे होते. पण, चढाईपटूंनी केलेल्या कौशल्यपूर्ण खेळाने सामन्याचे चित्र सतत पलटी घेत होते. तेलुगूने पहिले पाच गुण मिळविले तेव्हा पलटण संघाला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर तेलुगुने ६-१ अशी आघाडी घेत पलटणवर लोणचे संकट आणले होते. या वेळी पुन्हा अंतिम सात जणात संधी मिळालेल्या पंकज मोहितने बोनससह दोन गुण मिळवताना पलटणचे आव्हान कायम राखले.
PK 11 Puneri Paltan Telugu Titans
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजयTamil Thalaivas PKL 11: गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला.
और पढो »
भारताच्या माजी क्रिकेटपटूला लागली लॉटरी! 'या' राजघराण्याचा वारसदार म्हणून घोषितगुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसाची घोषणा केली आहे.
और पढो »
मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनMNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
और पढो »
म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळलेMumbai Mhada Lottery 2024: मुंबई म्हाडा मंडळाने 2024 साठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »
'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारणAjit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »
पवन सेहरावत और तेलुगु टाइटंस के कोच कृष्ण हुड्डा के बीच है एक खास रिश्तापवन सेहरावत और तेलुगु टाइटंस के कोच कृष्ण हुड्डा के बीच है एक खास रिश्ता
और पढो »