Devendra Fadnavis on Rahul Gandhi over Pune Porsche Accident: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुणे कार अपघातावर (Pune Car Accident) बोलताना श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा, अशी टीका केली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना सुनावलं आहे.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi over Pune Porsche Accident: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुणे कार अपघातावर बोलताना"श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा," अशी टीका केली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावलं आहे.पुण्यातील पोर्शे कार अपघाताला जबाबदार अल्पवयीन चालकाला जामीन देताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नाराजी जाहीर केली आहे."श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा," अशी टीका त्यांनी केली आहे.
"पुण्यातील घटनेवर राहुल गांधी यांनी जे विधान केलं आहे, व्हिडीओ रिलीज केला आहे ते राजकारण करण्याचा फार वाईट प्रयत्न आहे. पुण्याच्या घटनेत पोलिसांनी योग्य कारवाई केली. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने जो निर्णय घेतला त्यावर आम्हीही आश्चर्य व्यक्त केलं. पोलिसांना पुन्हा अपील दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाला गाडी देणारा पिता, मद्य देणारे या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे माझ्या मते पोलिसांनी सर्व कारवाया केल्या आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"पण अशा घटनेचं फक्त राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि राजकारण करणं योग्य नाही. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर असं विधान केलं नसतं," अशी टीकाही त्यांनी केली. तसंच अग्रवाल कुटुंबाच्या छोटा राजन कनेक्शनबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले,"जे काही कनेक्शन असतील त्यांची चौकशी होईल. त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर कारवाई केली जाईल".
Pune Accident. Pune Porsche Accident BJP Devendra Fadnavis Rahul Gandhi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
और पढो »
चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
और पढो »
Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »
माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
और पढो »
'NDTV मराठी' लॉन्च के मौके पर डिप्टी CM देवेंद्र फडणवीस ने दीं शुभकामनाएंNDTV मराठी लॉन्च पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस.
और पढो »
बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाशिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
और पढो »