Pune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमशान घातले आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला, वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 23 हजार 122 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे तर नदीपात्रातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आला आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे विंझरमधील ओढ्यावरील पुल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नसरापूर-वेल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळित झाली.पुढील 24 तासांत मुंबईसह उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24तासांत मुंबईसह उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय..
मावळच्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. सध्या पवना धरणातून 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होतोय. संततधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणीपातळीतही प्रचंड वाढ झालीये. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तब्बल साडेतीन चार तास झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी साचलं. लहान मोठ्या नद्यां तुडुंब भरून वाहू लागल्या. सीना नदीला पूर आल्यामुळे काही काळ नगर कल्याण महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली.
Pune Rain Update Pune Bhide Bridge Bhide Bridge Underwater Maharashtra Rain पुणे पुणे पाऊस भिडे पूल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?Why floods in Pune: पुण्यात आज पावसाने विश्रांती घेतलीय.त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आलीय.कालच्या पुराचा पुणेकरांना मोठा फटका बसलाय.घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं.
और पढो »
Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
और पढो »
आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थितीPune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
और पढो »
'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
और पढो »
Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
और पढो »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
और पढो »