जम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
जम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याची पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास करत असून आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 9 जून रोजी दहशतवाद्यांनी भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला केला होता. गोळीबारानंतर बस दरीत जाऊन कोसळली होती. अनेक भाविक या हल्ल्यात जखमी झाले होते. दिल्लीत एनडीए सरकारचा शपथविधी सुरु असतानाच जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाला होता.
कांडा एरिया पोलिस स्टेशन, पौनी येथील पोलिसांच्या नेतृत्वात सखोल तपासानंतर या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हल्ल्यात संभाव्य सहभाग असणा-यांची ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. "हल्ला घडवून आणण्यात संभाव्यपणे सहभागी असणाऱ्यांची पटवण्यात आणि पकडण्यात मदत करण्यासाठी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सर्वसमावेशक तपास व्हावा यासाठी अर्नास आणि माहोरेच्या दूरवरच्या भागात शोध मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे. या ऑपरेशन्सचे उद्दिष्ट पुढील पुरावे उघड करणे आणि या दुर्गम भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडणं आहे," अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यासाठी आणि परिसरातील सर्व रहिवासी, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहेत. रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवण्याची सूचना केली आहे.खासदार झाल्यानंतर बॉलिवूड सोडणार? कंगना रणौतने सांगितलं राजकारण-अभिनयापैकी काय करणं जास्त सोपं!खासदार झाल्यानंतर बॉलिवूड सोडणार? कंगना रणौतने सांगितलं राज...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेJammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
और पढो »
Reasi Bus Attack: रियासी में आतंकी हमला करने वालों की अब खैर नहीं, CRPF की 11 टीमों ने कर दी घेरा बंदीReasi Terror Attack: जम्मू-कश्मीर में तीर्थयात्रियों पर हुए हमले मामले में आया बड़ा अपडेट, सेना और सीआरपीएफ की जॉइंट टीम ऑपरेशन में जुटी
और पढो »
सुरक्षाबल आतंकियों को ढूंढ रहे हैं- LG मनोज सिन्हाTerror Attack in Reasi: जम्मू संभाग के रियासी जिले में आतंकवादी हमला हुआ। बताया जा रहा है कि Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
सेना की वर्दी में आए आतंकी, ड्राइवर को बनाया निशाना… जम्मू के रियासी अटैक की Inside StoryTerror Attack in Reasi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शपथ ग्रहण वाले दिन ही जम्मू-कश्मीर में आतंकियों ने तीर्थ यात्रियों की बस को निशाना बनाया है।
और पढो »
Reasi Bus Attack: रियासी हमले का CCTV फुटेज सामने आया, गोलियों के बीच ड्राइवर ने दिखाया सहास, कई की जान बचाईReasi Bus Attack: जम्मू-कश्मीर के रियासी जिले में आतंकी हमले में 9 लोगों की मौत हो गई, वहीं 33 के घायल होने की सूचना मिली है.
और पढो »
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »