आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) जबरदस्त कामगिरी केली आहे. 385 धावा ठोकत टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) विकेटकिपरच्या स्पर्धेत तो पहिल्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने जबरदस्त कामगिरी केली आहे. 385 धावा ठोकत टी-20 वर्ल्डकपमधील विकेटकिपरच्या स्पर्धेत तो पहिल्या स्थानावर आहे.आयपीएलनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप होणार असून बीसीसीआयकडे संघ निवडण्यासाठी 1 मेपर्यंतची डेडलाईन आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. सध्या विकेटकिपरसाठी के एल राहुल, ऋषभ पंत यांच्यात चुरशीची लढत आहे. दुसरीकडे संजू सॅमसनही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण त्याला पुन्हा एकदा डावललं जाणार असल्याची चर्चा आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू केविन पीटरसननेही संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळावं यासाठी परखडपणे आपलं मत मांडलं आहे. लखनऊविरोधात 197 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने यश ठाकूरला विजयी षटकार ठोकला. स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना केविन पीटरसनने बीसीसीआयचे निवडसमिती प्रमुख अजित आगरकरला वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या अमेरिकेच्या विमानात संजू सॅमसन असला पाहिजे असं सांगितलं आहे.
"त्याला जावंच लागेल. काही आठवड्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात तो असला पाहिजे याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. त्याच्यावर फार दबाब असून, तो संघाचं नेतृत्वही करत आहे. पण त्याला अपेक्षित सन्मान मिळत नाही आहे. तो ज्याप्रकारे धावा करत आहे आणि ज्या परिस्थितीत फलंदाजी करत आहे ते पाहता मी सिलेक्टर असतो तर आधी त्याला निवडलं असतं," असं स्पष्टपणे पीटरसनने सांगितलं आहे.भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व परीक्षा संजू सॅमसनने यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत.
BCCI निवडकर्ते आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी टी-20 वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी नवी दिल्ली येथे भेटणार आहेत. दोन विकेटकीपिंग स्पॉट्सच्या आसपासच्या चर्चेत ऋषभ पंत आणि केएल राहुल देखील पर्याय म्हणून विचारात आहेत. या बैठकीनंतर लवकरच भारतीय संघाची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट चाहत्यांनाही भारतीय संघ कसा असेल याची उत्कंठा आहे.
Kevin Pietersen Ajit Agarkar T20 World Cup Lsg Vs Rr IPL 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Babar Azam: 'पाकिस्तान टीम का...', न्यूजीलैंड के खिलाफ मुकाबले से पहले कप्तान बाबर आज़म ने टी20 विश्व कप को लेकर दे दिया बड़ा बयानBabar Azam on T20 WC 2024
और पढो »
Irfan Pathan: 'विश्व कप में आप अनकैप्ड...', दिनेश कार्तिक को टी20 विश्व कप में नहीं मिलेगी जगह!, इरफान पठान के बयान ने मचाई खलबलीIrfan Pathan on Dinesh Karthik Chances for T20 WC 2024
और पढो »
T20 WC 2024: रिकी पोंटिंग ने टी20 विश्व कप के लिए भारतीय विकेटकीपर के तौर पर इस खिलाड़ी को बताया पहली पसंदRicky Ponting on Team India Squad for T20 WC 2024
और पढो »
Team India Opening Pair: टी20 वर्ल्ड कप में ये जोड़ी करेगी टीम इंडिया के लिए ओपनिंग!, सोशल मीडिया पर मची हलचल- रिपोर्टTeam India T20 WC 2024 Opening Pair
और पढो »
3 रन और गेल को पीछे छोड़ देंगे रोहित, T20 WC में होगा कमाल3 रन... गेल का टूट जाएगा रिकॉर्ड, T20 WC में रोहित करेंगे कमाल
और पढो »
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »