ठाण्यातील एका तरुणाने युट्यूबवरून चाफ्याची बाग फुलवली आणि महिन्याला हजारो रुपये कमावत आहे.
Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई Sucess Story: सामान्यपणे मोबाईलचा वापर हा टाइमपाससाठी केला जातो. मात्र ठाण्यातील एका तरुणाने युट्यूबवरुन शेतीला सुरुवात केली आहे.इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. ही म्हण ठाणे जिल्ह्यातील वांगणीजवळील डोणे गावातील संदेश सारंगा नावाच्या तरुणाने खरी करुन दाखवली आहे.
संदेश हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने युट्यूब पाहून केलेला एक प्रयोग एवढा यशस्वी ठरला आहे की त्यामधून तो महिन्याला एखाद्या कॉर्परेट कर्मचाऱ्याला लाजवेल एवढी कमाई करतोय. या तरुणाने नेमकं काय केलं आहे पाहूयात...वांगणीतील संदेश सारंगा यांनं कोरोना काळात शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला काय करता येईल हे एक्सप्लोअर करताना संदेश युट्यूबवर नवनवीन व्हिडीओ पाहायचा. यातूनच त्यांनं आपल्या शेतात चाफ्याची झाडे लावण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी लागणारे पैसे उभारण्याच्या उद्देशाने त्याने कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन शासकीय अनुदान मिळवलं. डोणे गावातील आपल्या शेतात संदेशने युट्यूब पाहून एक एकरामध्ये चाफ्याची बाग फुलवली. एक एकरात सौंदर्य जातीच्या चाफ्याची 300 झाडं संदेशने लावली.3 बाय 3 मीटर अंतरावर संदेशने एक एकरामध्ये या झाडांची लागवड केली. 4 वर्षांच्या या बागेतून दररोज संदेशला आता रोज 1500 ते 1800 फुलांचं उत्पन्न मिळतंय. कल्याण तसेच दादरच्या फुल मार्केटमध्ये चाफ्याच्या फुलाला सरासरी एक ते दोन रुपयांचा भाव मिळतो. गणेशोत्सव काळात हाच भाव जवळपास पाच ते दहापट इतका झालेला असतो. या बागेतून सर्व खर्च वगळता संदेश सारंगा याला महिन्याकाठी सरासरी 30 ते 45 हजारांचं उत्पन्न मिळतं.चाफ्याच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. शिवाय चाफ्याच्या बागेतून मिळणारं उत्पन्न हे दीर्घकाळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेतात नवनवीन प्रयोग केल्यास त्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. सध्याची तरुणाई ही मोबाईलच्या विळख्यात सापडलीय. मात्र मोबाईलचा सदुपयोग केला तर त्यातून उत्पन्नाचा एक चांगला मार्गही मिळू शकतो हे या युवा शेतकऱ्यानं दाखवून दिलय. त्याचा आदर्श इतर युवकांनीही नक्कीच घ्यायला हवा, असं मत आता व्यक्त केलं जात आह
Youth Agriculture Success Story Youtube Farming Flower Cultivation
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..'Kurla BEST Bus Accident Real Reason: बस अपघातातील मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचलेली असतानाच आता खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »
MS Dhoni ने पुन्हा दाखवली त्याची पॉवर, शाहरुख आणि बिग बींना मागे सोडून बनला ब्रँड एंडोर्समेंटचा 'बादशाह'धोनीने भारतातील सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंट लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं असून त्याने बॉलिवूडचे दिग्गज स्टार कलाकार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना देखील मागे सोडलं आहे.
और पढो »
विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने वेबसिरीज पाहून कट रचला. मात्र तो त्याच्यावरच उलटला आहे.
और पढो »
'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पृथ्वी शॉ अद्याप 25 वर्षांचा असून त्याच्याकडे पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे असंही त्याने सांगितलं आहे.
और पढो »
'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे.
और पढो »
भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यूPune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
और पढो »