India Vs Pakistan Asia Cup 2025: पाकिस्तानला भारताविरुद्धच्या युद्धात उघड मदत करणाऱ्या चीनला पंतप्रधान जाऊन आले व चीनने आमच्यासाठी कसे लाल गालिचे अंथरले त्याची वर्णने येथे केली.
India Vs Pakistan Asia Cup 2025 : भारतात मोदींचे राज्य आल्यापासून सोयीनुसार हिंदुत्व आणि सोयीच्या राष्ट्रवादास उभारी मिळाली आहे. देशभक्ती वगैरे गोष्टी फक्त निवडणुका आणि मतांपुरत्याच उरल्या आहेत. तसे नसते तर 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यास हिरवा कंदिल दाखवून पहलगाम हल्ल्यातील जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला नसता, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये ही जनभावनाकसला काय तो एशिया चषक दुबईत होत आहे. 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामना तेथे निर्लज्जपणे खेळवला जात आहे. भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये ही जनभावना आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या रक्ताचे पाट कश्मीर खोऱ्यात वाहिले. ते रक्त अद्याप सुकलेले नाही. 26 मायभगिनींच्या डोळ्यात आजही अश्रूंच्या धारा वाहत आहेत. मृतांची मुलेबाळे, मित्र परिवार धक्क्यातून सावरलेले नाहीत. पाकिस्तानने हा दहशतवादी हल्ला घडवला. त्यामुळे भारतीय लोकांत पाकड्यांविषयी कमालीचा संताप असताना ‘जागतिक’ आणि ‘आंतरराष्ट्रीय’ नियम वगैरे सांगत मोदी सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यास परवानगी दिली, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.वेदना सरकारच्या चेहऱ्यावर दिसत नाहीमोदी, शहा वगैरे पुढाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जो शोक व्यक्त केला त्यानुसार, ‘‘आता आम्ही पाकिस्तानचे कंबरडे असे मोडू की, पाकिस्तान परत जगाच्या नकाशावर दिसणार नाही. आता पाकिस्तानबरोबर निर्णायक लढाईला तोंड फुटेल व पाकव्याप्त कश्मीरात घुसून त्याचा ताबा घेऊ,’’ अशा गर्जना केल्या व त्या योग्यच होत्या. रणशिंग फुंकून भारताने त्या वेळी पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, पण ते अमेरिकेच्या प्रेसिडंट ट्रम्पच्या दबावामुळे थांबवले. प्रेसिडंट ट्रम्प वारंवार भारत-पाक युद्ध आपणच थांबवल्याचे सांगतात. त्यावर खुलासा न करता पंतप्रधान मोदी हे अमेरिका आपला मित्र असल्याचे टाळ कुटतात. पाकिस्तानला भारताविरुद्धच्या युद्धात उघड मदत करणाऱ्या चीनला पंतप्रधान जाऊन आले व चीनने आमच्यासाठी कसे लाल गालिचे अंथरले त्याची वर्णने येथे केली. पण चीनच्या सहकार्याने पाकिस्तान कश्मीरात ‘पहलगाम’प्रमाणे हिंदू रक्ताचे पाट वाहत आहे. आमच्या माय-भगिनींच्या कपाळावरचे ‘कुंकू’ म्हणजे ‘सिंदूर’ पुसत आहे. त्याची वेदना सरकारच्या चेहऱ्यावर दिसत नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.क्रिकेट खेळणे महत्त्वाचे की...भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तर निर्लज्जपणाचा कळसच आहे. मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, मात्र पुसलेल्या कुंकवाचा बदला घेऊ म्हणणारे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळताना दिसत आहेत. पाकिस्तानात ‘घुसून मारू’ असे वचन देणारे पाकिस्तानच्या कोणत्या अंगात घुसले ते त्यांनाच माहीत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने हे भारतीय महिलांच्या कुंकवाचा अपमान आहे. पाकिस्तानने निर्दयपणे मारलेल्या हिंदुजनांच्या बलिदानाचा अपमान आहे. क्रिकेट खेळणे महत्त्वाचे की पाकिस्तानला धडा शिकवणे महत्त्वाचे? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे....तर असे काय आकाश कोसळणार आहे?पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट सामन्यातून ‘जुगार’ खेळला जातो व त्यातून हजारो कोटींची आर्थिक उलाढाल होते. या उलाढालीचे सर्व लाभार्थी आता भाजपमध्ये विराजमान आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी गरजले होते की, ‘‘सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला मिळणार नाही. सिंधूचे पाणी आणि भारतीयांचे रक्त एकत्र वाहणार नाही. नाही, नाही, त्रिवार नाही.’’ मग काय हो मोदी, क्रिकेट आणि भारतीयांचे रक्त एकत्र कसे चालेल? माझ्या धमन्यांतून रक्त वाहत नसून गरम सिंदूर वाहत असल्याचे मोदी पहलगामनंतर म्हणाले होते. मग त्या गरम सिंदूरचे आता थंड आइस्क्रीम झाले काय? याचा जाब भारतीय जनता मागत आहे. पाकिस्तानबरोबर अशा स्थितीत क्रिकेट मॅच खेळणे राष्ट्रविरोधी आहे. कोट्यवधी हिंदूंचा, त्यांच्या माय-भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा अपमान करणारे आहे. पाकिस्तानबरोबर खेळलो नाही तर असे काय आकाश कोसळणार आहे? असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना विचारलाय.पाकिस्तानी खेळाडूंनी धर्मांतर केलं की...खरे म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर लगेच एक प्रखर हिंदुत्वाची बात याच मंडळींनी समोर आणली होती ती म्हणजे ‘‘पहलगाममध्ये जे अतिरेकी घुसले व पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत 26 जणांचे बळी घेतले तेथे प्रत्येकाला धर्म विचारून मारण्यात आले.’’ हा प्रकार भयंकरच आहे, पण मग आता दुबईत जो भारत-पाक क्रिकेट सामना होत आहे त्यात पाकच्या क्रिकेटपटूंनी धर्मांतर केले आहे की भारतातर्फे खेळणाऱ्यांनी स्वतःची वैचारिक सुंता केली आहे, हे पाहावेच लागेल, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.भारताचा स्वाभिमान आणि...एकवेळ आकाश जरी कोसळले असते तरी त्यावर पाय ठेवून भारताच्या पंतप्रधानांनी गरजायला हवे होते, ‘‘जोपर्यंत कुंकवाचा बदला सफल होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही.’’ पण सध्याचे राज्यकर्ते शेंदाड शिपुर्डेच निघाले. देश आणि कुंकवाच्या भावना पायदळी तुडवून पाकिस्तानशी क्रिकेट खेळत आहेत. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेटची वकालत करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला तोंडावर सांगितले, ‘‘जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सलगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कुठे? भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावेच लागेल, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Asia Cup 2025 Match Anti National Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi BJP Gov Pahalgam Attack
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Asia Cup 2025 : இந்தியா, பாகிஸ்தான் போட்டியை இலவசமாக பார்ப்பது எப்படி?India vs Pakistan Asia Cup 2025 Match for Free: ஆசிய கோப்பை தொடரில் இந்தியா - பாகிஸ்தான் போட்டியை இலவசமாக எப்படி பார்க்கலாம்? என்பதை இங்கே தெரிந்து கொள்ளுங்கள்
और पढो »
BAN vs HK: बांग्लादेश और हांगकांग का मैच शुरूAsia Cup 2025 Live: एशिया कप 2025 का तीसरा मुकाबला बांग्लादेश और हांगकांग के बीच अबू धाबी के शेख जायद स्टेडियम में खेला जा रहा है।
और पढो »
भारत-पाकिस्तान मैच से पहले विवाद, धूमल बोले-हमें खेलना ही होगा: हरभजन ने विरोध किया था, पंजाब किंग्स की पोस...India Pakistan Asia Cup 2025 Match Controversial Reactions; Follow IND Vs PAK Match, Dubai International Stadium Latest News On Dainik Bhaskar.
और पढो »
PAK vs OMA, Asia Cup 2025 Live: एशिया कप के लिए दोनों टीमेंPAK vs OMA, Asia Cup 2025 Live Updates: एशिया कप 2025 के चौथे मुकाबले में ओमान की टीम का सामना पाकिस्तान से हो रहा है। ये मैच दुबई के दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेला जा रहा है।
और पढो »
'मिशन पाकिस्तान' पर गौतम गंभीर इस प्लान से करेंगे हैरान? जुआ नहीं, ये सोची समझी चाल होगी!Asia Cup 2025: एशिया कप 2025 में रविवार को भारत और पाकिस्तान के बीच हाईवोल्टेज मैच खेला जाएगा। इस मैच में गौतम गंभीर एक तगड़ी चाल चलने वाले हैं।
और पढो »
ओमान को हराने के बाद तेवर तो देखो... टीम इंडिया को चुनौती दे गए सलमान आगा, हाईवोल्टेज मैच से पहले घमंडAsia Cup 2025: एशिया कप 2025 में पाकिस्तान की टीम ने ओमान को 93 रन से हरा दिया। इस जीत के बाद पाकिस्तान के कप्तान सलमान आगा ने एक बड़ा बयान दिया।
और पढो »




