माझी मुलगी हिनायाने (Hinaya) विराट कोहलीला मेसेज करुन कसोटी करिअर थांबवण्याचं कारण विचारल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) दिली आहे.
'तू निवृत्ती का घेतलीस?', हरभजन सिंगच्या 8 वर्षाच्या लेकीचा विराट कोहलीला मेसेज; उत्तर देताना म्हणाला 'अगं मुली.' माझी मुलगी हिनायाने विराट कोहलीला मेसेज करुन कसोटी करिअर थांबवण्याचं कारण विचारल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने दिली आहे.
'तू निवृत्ती का घेतलीस?', हरभजन सिंगच्या 8 वर्षाच्या लेकीचा विराट कोहलीला मेसेज; उत्तर देताना म्हणाला 'अगं मुली....' माझी मुलगी हिनायाने विराट कोहलीला मेसेज करुन कसोटी करिअर थांबवण्याचं कारण विचारल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने दिली आहे.भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वाला एकच धक्का बसला होता. विराट कोहलीच्या नाराज चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या मुलीचाही समावेश होता. विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर माझी मुलगी फार भावनिक झाली होती असा खुलासा हरभजन सिंगने केला आहे. चिमुरडीने वडिलांना अनेक प्रश्न विचारत विराट कोहलीने अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा वडील योग्य उत्तर देण्यात असमर्थ ठरत आहेत असं लक्षात आल्यानंतर तिने स्वत: विराट कोहलीशी संपर्क साधण्याचं ठरवलं. हरभजनने सांगितलं की, त्याची मुलगी हिनायाने कोहलीला मेसेज करून त्याच्या कसोटी बॉल कारकिर्दी संपवण्याच्या निर्णयामागील कारणे विचारली. हा मेसेज पाहिल्यानंतर विराक कोहलीदेखील काहीसा भावूक झाला. त्याने तिला उत्तर दिलं की,"बेटा, वेळ झाली आहे." "मी ट्विट केलं आणि विचारलं की का, विराट का? तू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतलीस? माझ्या मुलीनेही मला विचारले, 'बाबा, विराट का निवृत्ती घेत आहे?' तिने विराटला मेसेज करून म्हटले, 'मी हिनाया बोलत आहे, विराट, तू निवृत्ती का घेतलीस?'. या मेसेजनंतर विराटही भावूक झाला. तो हसला आणि उत्तर दिलं की, 'बेटा, वेळ झाली आहे'. त्याला सर्वोत्तम गोष्टीची जाण आहे," असं हरभजनने Instant Bollywood शी संवाद साधताना म्हटलं.हरभजन आणि कोहली यांनी भारतासाठी 8 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने एकत्र खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही ते भाग होते. कोहलीने 12 मे रोजी कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय विराट कोहलीने भारतासाठी 123 कसोटी सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 30 शतकांसह 9230 धावा केल्या. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने टी-20 मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे आता विराट कोहली फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे. "मी या फॉरमॅटमधून बाहेर पडत असताना, ते सोपे नाही. पण मला हे योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे असलेलं सर्व काही दिलं आहे आणि मी ज्या अपेक्षा करू शकत होतो त्यापेक्षा खूप जास्त मला परत दिलं आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निघून जात आहे, खेळासाठी, ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि प्रवासात मला ओळख मिळवून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी," असं त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता, ज्याने 2022 मध्ये कर्णधारपद सोडण्यापूर्वी 68 सामन्यांमध्ये 40 विजय आणि 17 पराभवांची नोंद केली. त्यानंतरचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे ज्याने 60 पैकी 27 विजय मिळवले आहेत.
Virat Kohli Retirement Harbhajan Singh Hinaya Indian Cricket Virat Kohli
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2025: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वयात फेरफार? विजेंदर सिंगच्या पोस्टने खळबळ; म्हणाला 'आजकाल क्रिकेटमध्ये....'माजी बॉक्सर विजेंदर सिंगने (Vijender Singh) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेटमध्ये वयात फेरफार केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांना त्याचा इशारा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे असल्याचं वाटत आहे.
और पढो »
Virat Kohli ने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती; भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठा धक्काVirat Kohli Test Retirement: मागील काही दिवसांपासून विराट कोहली कसोटीमधून निवृत्ती घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती आणि चाहत्यांची भिती खरी ठरली आहे.
और पढो »
'मला नाही वाटत विराट आणि रोहित...'; गावसकरांचं रोठठोक भाकित; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला बसेल धक्काSunil Gavaskar On Rohit Sharma Virat Kohli: विराट आणि रोहित या दोघांनी दोन आठवड्यांमध्ये एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
और पढो »
BCCI ने कोहलीला निरोपाची टेस्ट नाकारल्याने RCB च्या चाहत्यांचा 'विराट' प्लॅन; शनिवारी IPL सामन्यात..IPL 2025 KKR Vs RCB Fans Tribute To Virat Kohli: विराटने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो शनिवारी पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.
और पढो »
'गिलचं संघातलं स्थान निश्चित नाही त्याला कुठं कर्णधार बनवताय? त्याऐवजी...'; श्रीकांत यांनी सुचवली तीन नावंIndia new Test captain: विराट, रोहित आणि अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारत पाहिल्यांदाच कसोटी दौऱ्यावर जात असल्याने कर्णधार कोण हा मोठा प्रश्न निवड समितीला सोडवावा लागणार आहे.
और पढो »
'...हे लज्जास्पद आहे'; कट्टर प्रतिस्पर्धाचं विराटच्या निवृत्तीसंदर्भात धक्कादायक विधानVirat Kohli Test Retirement: विराट कोहलीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा पहिलाच परदेश दौरा इंग्लंडमध्ये असणार आहे.
और पढो »
