अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकार

Nagpur Crime News समाचार

अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकार
Nagpur Cyber CrimeNagpur Cyber Crime Newsसायबर क्राइम
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Nagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

देशात सायबर क्राइम आणि सायबर फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. अनेक नागरिकही या भामट्यांवर विश्वास ठेवून विश्वासाने त्यांची माहिती देतात. परिणामी त्याचा फायदा घेत सायबर चोरटे हातोहात लाखो करोडोंची रक्कम लंपास करतात. पोलिस सायबर क्राइम यावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. तसंच, आपली खासगी माहिती अज्ञात व्यक्तीला देऊ नये, असं आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, तरीरी नवीन कल्पना लढवत चोरटे सर्वसामान्यांना लुबाडत आहेत. सर्वसामान्यांनाबरोबर आता नेत्यांनाही सायबर चोरट्यांचा फटका बसला आहे.

अपघातात परिवारातील लोक मृत्युमुखी पडले आहे, त्यामूळे रुग्णवाहिका आणि इतर बाबीकरता करता तातडीने 6 हजार रुपयांची गरज असल्याची खोटी बतावणी करून आमदाराची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू असे आरापीचे नाव आहे.

ठकबाजाने भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची आर्थिक फसवणूक केली. आमदार कृष्णा खोपडे व त्यांचे सहकारी अरुण हारोडे 26 एप्रिला मुंबईला जात होते. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर प्रवीण कडू या ठकबाजचा फोन आला. त्याने आपले नाव व पत्ता सांगून कुटुंबासह ठाणे येथे प्रवासादरम्यान त्याच्या वाहनाला ठाणे येथे अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णवाहिकाही मिळत नाही व नागपूरला परतण्यासाठी डिझलचे पैसेही नसल्याची बतावणी करीत ६ हजार रुपयांची मागणी केली.

महत्त्वाचं म्हणजे या ठगबाजाने आमदारांना स्वतःचा परिचय देताना आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व परिचित असलेले नाव व ठिकाण ही सांगितले. आमदार खोपडे यांनी तत्काळ सहकारी हारोडे यांच्या मार्फत प्रवीण कडूच्या खात्यात 6 हजार रुपये वळते केले. मात्र आमदार खोपडे नागपूरला परतल्यावर कडू परिवार सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या ठकबाजाने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यताही आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nagpur Cyber Crime Nagpur Cyber Crime News सायबर क्राइम नागपूर ताज्या बातम्या नागपूर आजच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानं वळवल्या नजरा.
और पढो »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
और पढो »

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारामाझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..''कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारलग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:42:16