Akola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Akola News in Marathi) :
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात गरमपासून वाचण्यासाठी घरोघरी कूलर लावण्यात येतात. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला असून उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतेय. अशात उन्हापासून दिलासा म्हणून विदर्भात कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र अकोल्यात कुलरचा वापर एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह वाहू लागला.
रविवारी रात्री 9 च्या सुमारास कुलर जवळ खेळत असताना ही घटना घडली आहे. कुलरमधील एक तार तुटला आणि हा तार कुलरच्या जाळीला लागला त्यामुळे कुलरच्या जाळीत विद्युत प्रवाह वाहू लागला. खेळता खेळता या चिमुकलीचा हाथ कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी युक्तीला दवाखान्यात दाखल केलं मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
आतापर्यंत जिल्ह्यात या उन्हाळ्यात कुलरचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महावितरण द्वारे सुद्धा दर उन्हाळ्यात कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. तरी मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळे नागरिकांना आपला जीव गमावा लागतोय. त्यामुळेच कुलर वापरताना सर्व काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
Police Akola News Update Electric Shock Maharashtra Maharashtra News Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना CCTV त कैद11 Year Pune Boy Died While Playing Cricket: आपल्या राहत्या घराखाली इमारतीमध्ये मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असलेल्या या मुलाबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सोसायटीमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
और पढो »
3 विकेट्स घेतल्यानंतर काही तासांत 20 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू; शेवटच्या मॅचमधला व्हिडीओ Viral20 Year Old Cricket Player Died Final Match Video: मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो मैदानात संघासाठी सामना खेळत होता. त्याने या सामन्यामध्ये एकूण 3 विकेट्स घेत संघाच्या कामगिरीमध्ये मोलाची भर घातली. मात्र पुढील काही तासांमध्येच त्याने प्राण सोडला.
और पढो »
परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येCrime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.
और पढो »
लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
और पढो »
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »