IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रशिक्षकपदाची जबाबादारी सांभाळणार अशी चर्चा होती. पण राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सशी जोडले गेले आहेत. राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची कमान श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराच्या हाती होती. 2021 मध्ये संगकारा राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता.
ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार फ्रँचाईजीबरोबर करार झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी लगेच आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. आयपीएल 2025 हंगामाआधी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड यांनी रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर काम सुरु केलं आहे.रिपोर्टनुसार टीम इंडियाचे माजी बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांची राजस्थान रॉयल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ शकते. विक्रम राठोड यांनी भारतीय संघाचे सिलेक्टर म्हणूनही काम केलं आहे.
Rajasthan Royals Rahul Dravid Rajasthan Royals Head Coach Rahul Dravid Head Coach As Rajasthan Royals Cricket Dravid IPL Rahul Dravid Rajasthan Royals Dravid Rajasthan Royals राहुल द्रविड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
और पढो »
राहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार?Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आयपीएलच्या नव्या हंगामात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते.
और पढो »
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.
और पढो »
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »
टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी 'या' दिग्गजाची नियुक्ती, जय शहा यांची घोषणाMorne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
और पढो »