Maharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उध्दव ठाकरेंचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला धक्का; आनंद दिघेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतन येथील मेळावा संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
शिवेसेनेच्या सुरुवातीच्या काळात अनिताताई बिर्जे यांनी शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. 'धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर या निर्णयाला अनिता बिर्जे यांनी विरोध केला होता. त्यांनी ठाकरे गटात राहणेच पसंत केले होते. तेव्हा त्यांनी उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच अनिताताई बिर्जे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारीदेखील नाराज असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात मेळावा सुरू असतानाच अनिता बिर्जे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.
Maharashtra Live News Today Marathi News Today उद्धव ठाकरे एकनाश शिंदे Eknath Shinde Uddhav Thackeray Anita Birje
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीBreaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.
और पढो »
विनेश फोटागसंदर्भात हरियाणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय! CM म्हणाले, 'विनेशचं एखाद्या...'Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
और पढो »
VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे.
और पढो »
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
'स्क्रीप्ट रेडी आहे, चित्रपटाचे नाव 'नमक हराम 2'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात संजय राऊतांचा हल्लाबोलShivsena UBT Melava : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा (Shivsena UBT) आज ठाण्यात मेळावा झाला. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
और पढो »
विचारेंनी खटला दाखल केल्यावर संतापले नरेश म्हस्के; म्हणाले,'जे काही खटले असतील...'MP Naresh Mhaske On Hiding Information Case:ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील वाद काही मिटतानाची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये 2 गट पडले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असले तरी शिंदेंपुढे ठाण्यात ठाकरेंचा करिश्मा काही चालला नाही.
और पढो »