Maharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या काहि दिवसांपासून पावसाने झोडपले होते. अजूनही राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील तलावांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, त्याचे वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मात्र, शुक्रवार 26 जुलै पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, आज बुधवारसाठी हवामान विभागाने रायगड, साताऱ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, नाशिक, पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, नागपूर, अमरावतीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.ऑरेंज अलर्ट – सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक.शहर जिल्ह्यात गेले 3 तासापासून पावसाची संततधार सुरू असून इरई धरणाची सर्व 7 दारे 1 मीटरने उघडली गेली आहेत.
Maharashtra Rain Alert Maharashtra Weather Alert महाराष्ट्र ताज्या बातम्या महाराष्ट्र आजच्या बातम्या Mumbai Rain Alert Mumbai Rain Update आजचे हवामान Rain Alert Weather Today At My Location आज पाऊस पडणार आहे का
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 29 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज स्वत:ला सिद्ध केले पाहिजे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »