PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात शिक्षण आणि तरुणांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात नोकरी आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 पीएम पॅकेज योजनेचा त्यांनी उल्लेख केला. यात एक योजना अशी आहे, ज्यात एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत करण्यात येणार असून दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 5 वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.
हे तरुण 12 महिने त्या प्रशिक्षण संस्थेत शिकतील आणि स्वत:ला भविष्यासाठी तयार करतील, या दरम्यान त्यांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इंटर्नशिप भत्ता दिला जाईल. याशिवाय 6 हजार रुपये एकरकमी मदत भत्ताही दिला जाणार आहे.शिक्षणादरम्यान किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप करून कोणत्याही क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पण यासाठी वयाची अट ठेवण्यात आलीय. 21 ते 24 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
दुसरी योजना आहे- मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रोजगार निर्मिती. यात पहिल्यांदाच उत्पादन क्षेत्रात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPFO ठेवींच्या आधारे पहिल्या 4 वर्षांसाठी प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. 30 लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे.हेल्थ
PM Internship Scheme 1 Crore Youth Rs 5000 Allowance Per Month PM Package Scheme Nirmala Sitaraman Internship
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमPune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
और पढो »
Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतOBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे.
और पढो »
Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »
बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »