Mumbai Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. म्हाडाकडून आता पुन्हा एकदा लॉटरीची तारीख लांबणीवर पडली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2024साठी 2030 घरांसाठी लॉटरी काढली आहे. म्हाडाची लॉटरी जाहिर झाल्यापासून त्याच्या किंमतीवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेर म्हाडाने घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, असं असतानाच १३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे.
म्हाडा प्राधिकरणाने मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता ४ सप्टेंबरऐवजी इच्छुकांना १९ सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्याच वेळी १३ सप्टेंबरची सोडत लांबणीवर गेली असून लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सप्टेंबरअखेरीस म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे.
मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत मंडळाने ९ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. मात्र या प्रक्रियेसाठी केवळ २६ दिवसांचाच कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोडत लवकर काढण्याचा आग्रह राज्य सरकारचा होता. पण आता आचारसंहिता लांबणीवर पडल्याने म्हाडाने अखेर १३ सप्टेंबरची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली.
- नोंदणी करतेवेळी अर्जदाराला डीजी लॉकर या अॅपमध्ये स्वतःसह पती-पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करुन ते लिंक करणे गरजेचे आहे.म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिका संगणकीय सोडत प्रणालीतून विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Mumbai Mhada Lottery 2024 Mhada Lottery Mhada Lottery 2024 Upcoming MHADA Lottery 2024 Mumbai Price मुंबई म्हाडा 2024 मुंबई म्हाडा लॉटरी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
और पढो »
उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »
मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्याMHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
और पढो »
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »