Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय.
मुबईतल्या सर्व पाच टोल नाक्यांवर लाडू-पेढे वाटून दिवाळी साजरी करण्यात आली. कारण मुंबई तल्या एंट्री गेट टोल नाक्यांवर कारचालकांकडून सोमवारी शेवटचा टोल वसुल करण्यात आला. राज्य सरकारनं मुंबई च्या प्रवेशद्वारांवरील पाच टोल नाक्यांवर छोट्या वाहनांसाठी टोलमाफी जाहीर केलीय. त्यानुसार वाशी, दहिसर , मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि मुंलुंड पूर्व या टोलनाक्यावर कारचालकांना टोलमुक्ती मिळालीय. एसटी आणि स्कूलबसही टोलमधून दिलासा देण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडका प्रवासी योजना सुरु केल्याचा दावा केलाय.
सरकारच्या या टोलमाफीवर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय. टोलमाफीतून ठेकेदारांचं उखळ पांढरं होणार असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. 2026 पर्यंत टोलवसुलीची मुदत होती. ती वेळेआधी संपुष्टात आणण्यात आलीय. मुंबई एंट्री पॉईंटचे टोलमाफीच्या मोबदल्यात ठेकेदारांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम साडेतीन हजार कोटींच्या घरात असेल असं सांगण्यात येतंय. हे पैसे सरकारच्या तिजोरीतून द्यावे लागणार असल्याचे संकेतच एमएसआरडीसी मंत्री दादा भुसेंनी दिलेत.
मुंबईकरांच्या भल्यासाठी टोलमुक्तीचा निर्णय घेतल्याचं सरकार सांगत असलं तरी विरोधकांचा यावर विश्वास नाही. मुंबईकरांना टोलमुक्तीची फळं किती चाखायला मिळतील माहिती नाही पण ठेकेदारांचं मात्र यातून चांगभलं झालंय एवढं मात्र खरं.मालाड स्थानकाबाहेर राडा! आई वडिलांसमोरच मनसैनिकाला जीव जाईप...बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश...
Too Waiver Toll Exemption Mahayuti Government Opposition Doubts Mumbai Toll Plaza Toll Free मुंबई टोलमाफी हलक्या वाहनांना टोलमाफी ठाणे मुलुंड दहिसर वाशी आणि ऐरोली Thane Mulund Dahisar Vashi And Airoli Mumbai Toll Free
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
इसराइल-ईरान संघर्ष: नेतन्याहू अमेरिका की किस 'कमज़ोरी' का फ़ायदा उठा रहे हैं?इसराइल-ईरान संघर्ष: नेतन्याहू अमेरिका की किस कमज़ोरी का फ़ायदा उठा रहे हैं?
और पढो »
180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
और पढो »
मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय? लोकलचे वेळापत्रक एकदा पाहाचMumbai Megablock News Today: मुंबईकरांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे.
और पढो »
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
और पढो »
मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
और पढो »
सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे.
और पढो »