दोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली

Mumbai News समाचार

दोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली
Mumbai PoliceMumbai CrimeMaid Theft Cases
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 91 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे.

दोन वर्षानंतर एका चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. खार पोलिसांनी एका महिलेवर दागिने चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संजना गुजर या महिलेवर 8 लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्राम व्हिडिओमुळं या चोरीचा छडा लागला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली की नाही हे मात्र अद्यार समजू शकलेले नाही.

चोरीचे दागिने घालून मोलकरणीने रिल इन्स्टाग्रामवर शेअर केलं होता. हाच व्हिडिओ तिच्या मालकिणीने बघितला. तेव्हा तिने लगेचच त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि पोलिसांना माहिती दिली. खार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 49 वर्षीय महिलेचे 8 लाखांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार तिने दाखल केली होती. विशेष म्हणजे याच महिलेने तिचे दागिने परत मिळवण्यासाठी व केस सोडवण्यास पोलिसांची मदत केली.

महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. यात तिच्याच घरी एक आठवड्यासाठी काम करण्यासाठी आलेल्या मोलकरणीने तिचीच डायमंड रिंग घालून रील पोस्ट केली आहे. त्यानंतर महिलेने लगेचच पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात एका उच्चभ्रू वास्तुत राहणाऱ्या महिलेने एका तक्रार दाखल केली होती. दोन मुलांना संभाळण्यासाठी तिच्याकडे दोन महिला काम करतात.

त्याचदरम्यान महिलेला पतीसोबत दुबईला कामानिमित्त जायचे होते. तेव्हाच तिच्याकडे काम करणारी जुनी मोलकरीण पुन्हा कामावर रुजू झाली. तर, नव्या मोलकरणीने कामावर येण्यास नकार दिला. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, तिला एकेदिवशी पार्टीला जायचं होतं तेव्हा तिने कपाट उघडलं तर त्यातील दागिने चोरीला गेले होते. यात पाच सोन्याच्या अंगठ्या त्यातील एकात हिरा जडवला होता. या दागिन्यांची किंमत 7 लाख रुपये होती. एक कानातले रिंग ज्याची किंमत 1 लाख रुपये होती. म्हणजेच जवळपास 8 लाखांचे दागिने चोरीला गेले होते.

तक्रारदार महिलेने तिच्या तिन्ही मोलकरणींना दागिन्यांबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोणतीच माहिती नसल्याचे म्हटलं होतं. 10 सप्टेंबर रोजी जेव्हा तक्रारदार महिला सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघत होती तेव्हा तिने पाहिले की तिची तिसरी मोलकरीणीने एक रिल पोस्ट केले होते. त्यात तिने तेच दागिने घातले होते जे चोरी झाले होते. तेव्हा तिने लगेचच स्क्रीनशॉट काढत पोलिसांत धाव घेतली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Mumbai Crime Maid Theft Cases Crime News Mumbai Live News Today Mumbai Crime News मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या इन्स्टा पोस्ट पाहून मिळाली अंगठी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंव्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंएका व्यक्तीने असे धाडस केले आहे जे पाहून यमराजही अचंबित होतील. एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे.
और पढो »

दहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्यादहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्याSambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला रोडरोमिओच्या छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलंय.. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
और पढो »

बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलबदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलBadlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
और पढो »

ठाणे हादरलं : आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!ठाणे हादरलं : आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!Thane Crime News: ठाण्यातील दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आता उलगडा झाला आहे.
और पढो »

मध्यरात्र,प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!मध्यरात्र,प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली. घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला.
और पढो »

J-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीJ-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीकाश्मीरमध्ये सध्या दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून दोन शहीद झाले आहेत. तर कठुआमध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:52:11