Benefits Of Gold Investment: भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवसांत सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.
आज 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवसांत सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दागिन्यांच्या रुपात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. तसंच, सोनं हा असा मौल्यवान धातु आहे ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं सोन्यात गुंतवणुक करण्याची परंपरा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकं सोन्याला वाईट काळातील मित्र समजतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की, घरात सुख समृद्धी राहते. मात्र, खरं म्हणायचं झालं तर सोनं गुंतवणुकीसाठीचा सर्वात उत्तम पर्याय आहे. सोन्यात गुंतवणुक करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या पद्धतीने सोन्याच्या दरात वाढ होत आहे त्या हिशोबाने सोनं भविष्यात चांगला परताना देऊ शकतो. धनत्रयोदशी वा इतर सणांच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर भविष्यासाठी तुम्ही चांगली तरतूद करत आहात.
कठिण काळात जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते तेव्हा तुम्ही खरेदी केलेले सोनं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तुम्ही सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही सोनं विकून पैसे उभे करु शकता. सोनं हे असं धन आहे जे तुम्ही सहजरित्या कुठेही नेऊ शकता.तुम्ही देखील धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर गरजेचे नाही की दागिन्यांचीच खरेदी केली पाहिजे. फिजिकल गोल्डव्यतिरिक्त डिजीटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ या पर्यायांचादेखील विचार करु शकता.
Gold Purchasing Significance Gold Purchasing Significance On Dhanteras On Dhanteras 2024 Gold Gold Investment Gold Investment Benefits Benefits Of Gold Investment Physical Gold Physical Gold Benefits
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावGold Price Today, 9th October: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात
और पढो »
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दरGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »
सोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरेGold Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात आज सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागणार असण्याची चर्चा आहे.
और पढो »
पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यशMaharashtra Assembly Election 2024 Pune Police Found 138 Crore Gold: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जागोजागी करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पुणे पोलिसांना हे यश मिळालं आहे.
और पढो »
Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीला प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा; लक्ष्मी कायम तुमच्याकडे वास करेलधनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा सण. या दिवशी धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते. कायम लक्ष्मीचा आशिर्वाद आपल्यावर राहावा असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळी आपल्या जवळच्या मंडळींना धनत्रयोदशीच्या दिवशी द्या मराठमोळ्या शुभेच्छा.
और पढो »