नांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही.
तब्बल 25 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होतात. तब्बल 25 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होतात.
उन्हाळ्यात बोअर कोरडे पडल्याने अनेक नगरातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्यांची कुवत आहे ते पाण्यासाठी पैसे मोजून टँकरने पाणी खरेदी करतात. पण गोरगरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होतात. या भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पावडेवाडी ग्रामपंचायत करत आहे. पण टँकरची संख्या खूप अपुरी आहे. टँकर आल्यावर नागरिक टँकरवर तुटून पडतात. पाण्यासाठी मोठी कसरत करूनही अनेकांना पाणी मिळत नाही.
पावडेवाडी भागात मोठे नागरीकरण झाल्याने ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेसोबत करार केला. पण 20 दिवसांपूर्वी नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणातील पंपगृहाची मुख्य पाईलाईन फुटून बिघाड झाला होता. आठ दिवसानंतर तो बिघाड दुरुस्त होऊन नांदेड शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. पण पावडेवडीला मात्र पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आंदोलन केले. शहरात माणसं राहतात, मग ग्रामीण भागात माणसं राहत नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
पंपगृहात बिघाड झाल्याने नांदेड शहराचा पाणीपुरवठा आठ दिवस बंद होता. तो हळूहळू सुरळीत होत आहे. नांदेड शहरालाच अजून पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे पावडेवाडीचा पाणीपुरवठा शक्य होत नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. पण त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून 55 हजार लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पा...
Nanded Water Issue Nanded Water Shortage Pavedewadi Water Supply Pavedewadi Water Supply Stopped
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लकPune s Water Crisis: पुणेकरांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढवू शकते. खडकवासला धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
और पढो »
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
और पढो »
तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचंWater Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
और पढो »
Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टMaharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
और पढो »
मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादीMumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.
और पढो »