Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वांद्रे, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी ही स्थानके गाठावी लागतात. मात्र, आता पश्चिम रेल्वे मार्गावरही एक नवीन टर्मिनस होत आहे. मुंबईतील हे सातवे टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसचे काम 76 टक्के पूर्ण झाले आहे. या टर्मिनसमुळं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच हे नवीन टर्मिनस प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची नेहमीची तक्रार असते ते म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जावे लागते. आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना वांद्रे व बोरिवली स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. मात्र, येथेही मर्यादित स्वरुपातच गाड्या सोडल्या जातात. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी व राम मंदिरा लगतच नवीन टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसवर वांद्रे आणि मुंबई सेंट्रल येथून अंदाजे 12 लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थलांतरित होऊ शकतात.
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे. राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे. तसंच, या टर्मिनसवरुन 24 डब्याच्या रेल्वे गाड्यादेखील चालवता येऊ शकतात असे फलाट निर्माण करु शकतात. तसंच, सार्वजनिक सुविधा व्हावी यासाठी वाहनांसाठी विशेष व्यवस्थादेखील असणार आहे. पादचारी प्रवाशांसाठी राखीव क्षेत्र आहे. तसंच, खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे.
टर्मिनस उभारण्यासाठी 76 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून 2019मध्ये आणि पुन्हा 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती. बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. दोम मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे.
Indian Railways Railways News Jogeshwari Terminus Mumbai Jogeshwari Terminus Mumbai Railway Station Railway Station Mumbai Mumbai Trains Trains Jogeshwari MUMBAI CENTRAL Dadar Bandra Terminus मुंबई लोकल ताज्या बातम्या मुंबई लोकल बातम्या Mumbai Local Train Update Mumbai Local News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्याBadlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
और पढो »
पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.
और पढो »
Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळKolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
और पढो »
आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाMadgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
और पढो »
'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोलाPrakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
और पढो »