Pune Accident News: पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. अल्पवयीन मुलगा टँकर चालवत असल्याचे समोर आले आहे. टँकरच्या धडकेत तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
पुणे गेले काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात या विषय चर्चेत आला आहे. आता पुण्यात आणखी एक अशीच घटना घडली आहे. वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. धक्कादायक म्हणजे टँकर चालक हा अल्पवयीन आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
टँकरच्या धडकेत झालेल्या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. त्यामुळं परिसरात थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले होते. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुले वाहने चालविताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या १४ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Pune News Today पुणे ताज्या पुणे अपघात पुणे वानवाडी अपघात Pune Minor Accident 2024 Pune Car Crash
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »
'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »
माझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही असा ट्रेंड सुरु आहे.
और पढो »
'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेखMaratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
और पढो »
'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौनSonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे.
और पढो »
Pune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन अपडेट समोर आली आहे. तो भीषण अपघात पुणे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जीवंत केलाय.
और पढो »