पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ

Maharashtra समाचार

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ
NagpurNutritional DietPoor Nutrition
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Maharashtra : नागपुरात शालेष पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्यातही अशाच घटनेने खळबळ उडाली आहे. आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलंय.

नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासंदर्भात, सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिलंय.दरम्यान, तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिलीय.

पुण्यातही अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

नागपूर असो वा पुणे. दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय, हे वास्तव आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं कोण कुणाचं पोषण करतंय, हा देखील मोठा सवाल आहे.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये 22 नोव्हेंबर 1995 पासून इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येतं.

सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार 2002 पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे. यासाठी काही संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. पण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याच्या तक्रारी करण्यात प्राप्त झाल्यात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nagpur Nutritional Diet Poor Nutrition Dead Sparrow Found In Students Nutrition Pune

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
और पढो »

आईस्क्रिममध्ये बोटाचा तुकडा, कॉफीत प्लास्टिकचे तुकडे, दुधात गोठ्यातलं पाणी... राज्यात चाललंय काय?आईस्क्रिममध्ये बोटाचा तुकडा, कॉफीत प्लास्टिकचे तुकडे, दुधात गोठ्यातलं पाणी... राज्यात चाललंय काय?Maharashtra : राज्यात सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसात धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामुळे अन्न आणि औषध विभाग करतंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय.
और पढो »

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »

ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात राज्यात पोलिसांच्या 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरु.. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरात तयारी केली जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:54:03