Uddhav Thackeray on Jay Bhawani : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गीतातील 2 शब्दांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोग ाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.केंद्रीय निवडणूक आयोग ाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गीतातील 2 शब्दांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित असलेले हे दोन शब्द कोणत्याही परिस्थितीत काढले जाणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले. हे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रचाराताली व्हिडीओ दाखवले.
अटलजी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदू धर्माचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारातील भाषणात 'बजरंग बली की जय बोलून बटण दाबा' असं सांगतायत. अमित शाह 'बजरंग बलीचं दर्शन देतो' असे म्हणतात. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदु धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे. तसेच हिंदु हा तुझा धर्म या शब्दावरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय.
सर्वात आधी मोदी-शहांवर कारवाई करा. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल द्वेश जनता खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटण दाबा असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही रामलल्लाचे दर्शन देतो, असे अमित शाह म्हणाले. गेली कित्येक वर्षे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. तुळजाभवानी हे आपलं कुलदैवत आहे. त्यामुळे आम्ही हे शब्द गीतातून वगळणार नाही, असे ते म्हणाले.
Uddhav Thackeray Uddhav Thackeray On Bhawani Uddhav Thackeray On Hindu Uddhav Thackeray Alligance Election Commission Shivsena Song Jay Bhawani Word Shivsena Mashal Song शिवसेना गीत 'जय भवानी उद्धव ठाकरे निवडणूक आयोग Lok Sabha Lok Sabha Election 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
और पढो »
महाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींMaharashtra Loksabha Election: कागज पर, उद्धव ठाकरे और शरद पवार के नेतृत्व वाले संगठनों में सीधे बंटवारे के बावजूद, महाराष्ट्र विकास अघाड़ी अब तक का सबसे दुर्जेय गठबंधन नजर आता है,
और पढो »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »
सलमान खान के घर पर फायरिंग करने वाले शूटर्स का गुजरात कनेक्शन, उद्धव ठाकरे बोले- वहां क्यों मिलते हैं सब?Uddhav Thackeray On Salman Khan House Firing News: उद्धव ठाकरे ने आज शिवसेना की उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के चुनाव चिन्ह मशाल का अनावरण किया। इस दौरान उन्होंने बीजेपी की जमकर आलोचना की। साथ ही सलमान के घर के बाहर फायरिंग करने वाले आरोपियों को पुलिस ने गुजरात से गिरफ्तार कर लिया है। उस पर भी उद्धव ठाकरे ने बीजेपी को घेर...
और पढो »
अजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्जvoter list Name:निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात.
और पढो »
'मैं हिंदू हूं, हमेशा हिंदू रहूंगा' 2 शादियों पर बोला एक्टर, लगा धर्म बदलने का आरोपअरमान मलिक इंडिया के मशहूर यूट्यूबर्स में से एक हैं, जो अपनी दो शादियों को लेकर हेडलाइंस में बने रहते हैं. अरमान का असली नाम संदीप है, जिनके बारे में कहा जाता है कि उन्होंने सच में दो शादियां नहीं की
और पढो »