Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला...
श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सणवारांची चाहूल लागते, उपवासांची सत्र सुरू होतात आणि मग अनेक घरांमध्ये उपवासाच्या फराळासाठीची लगबग सुरू होते. या महिन्यादरम्यान अनेक मंडळी मांसाहाराचा त्याग करून शाका हाराकडे वळत असल्यामुळं बहुतांश घरांमध्ये शाकाहारी स्वयंपाकाला प्राधान्य दिलं जातं. दिवसरात्र विविध प्रकारची व्यंजनं आणि पंगती उठतात.
ऐन श्रावणात आणि सणवारांच्या दिवसांमध्येच मागणी वाढल्यामुळं भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटार यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पुवरवठा पुरेसा असल्यामुळं शेवगा, घेवड्याच्या दरात मात्र घट झाली असून, इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.कोथिंबीर, मुळा, चवळई, चाकवत, पालकचे दर स्थिर आहेत. तर, कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिऱ्याच्या दरात घट झाली आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळं पालेभाज्यांची आवक वाढली आहे.
Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान? पावसाच्या या मोसमामध्ये बहुतांश भाज्या 40 रुपये प्रति किलोहून अधिकच्याच दरानं विक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाज्यांचे दर आणि भाजीपाला उत्पादकांचा नफा या साऱ्याचं मोठं गणित यामागं असल्याची बाब समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते भाजीपाला साठवून ठेवण्याची अनेक तंत्र उपलब्ध असल्यामुळं शेतकरी तो किमान दरात विक्री करताना दिसत नसून त्यामुळं भाजीपाला चढ्या दरात विक्री होताना उत्पादकांना याचा फायदा होताना दिसत आहे.
सातत्यानं होणारे हवामान बदल, पावसाचं कमीजास्त प्रमाण आणि ग्राहकांची मागणी या साऱ्यांचे परिणाम भाजीपाल्याच्या आणि फळांच्या दरांवर होताना दिसत असून, पुढील काही दिवस हे दर असेच राहण्याची शक्यता असल्यामुळं यंदाचा श्रावण सामान्यांना महागाईचा फटका बसणार हे नाकारता येत नाही.भारत
Vegetable Price Hike In India Vegetable Price Hike News Vegetable Price Today Vegetable Price In Mumbai Today Vegetable Price In Delhi भाज्या महागाई Inflation Inflation Rate RBI Money Business News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
संयुक्त राष्ट्र मिशन ने लीबिया में सैन्य तैनाती बढ़ने पर चिंता व्यक्त कीसंयुक्त राष्ट्र मिशन ने लीबिया में सैन्य तैनाती बढ़ने पर चिंता व्यक्त की
और पढो »
पाकिस्तान में सुरक्षा की चिंता, बांग्लादेश टीम ने सरकार से लगाई गुहारपाकिस्तान में सुरक्षा की चिंता, बांग्लादेश टीम ने सरकार से लगाई गुहार
और पढो »
दुनिया में सबसे ज्यादा महंगाई झेल रहे इन देशों के लोग, पाकिस्तान का हाल देखकर रह जाएंगे दंगWorld Inflation: महंगाई दर के मामले में दुनिया की टॉप देशों में अर्जेंटीना नंबर वन पर है और यहां महंगाई दर 254 फीसदी के भारी-भरकम लेवल पर है.
और पढो »
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
TVS Sales Breakup June 2024: TVS मोटर्स की बढ़ी 8.43 बिक्री, सबसे ज्यादा बिका Jupiter स्कूटरTVS Sales June 2024 जून 2024 में TVS मोटर की गाड़ियां कितनी बिकी इसकी रिपोर्ट आ गई है। जिसके मुताबिक इस कंपनी की गाड़ियों की साल-दर-साल 8.
और पढो »
VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
और पढो »